अर्थसंकल्पाच्या भाषणाचा इतिहास : कोणते होते सर्वात छोटे व सर्वात मोठे भाषण?
येत्या एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्यांच्या आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा दुसरा व पूर्ण पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने एक दिवस अगोदर होईल. म्हणजेच ३१ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अभिभाषण करतील. अर्थसंकल्पाची सध्या सर्वात जास्त चर्चा सुरु आहे. मात्र आत्तापर्यंत झालेल्या अर्थसंकल्पात कोणते भाषण हे सर्वात जास्त वेळ चालले, व कोणते भाषण सर्वात कमी वेळ चालले, याबाबत तुम्हाला माहिती आहे का..? आपण याच विषयावर आज माहिती घेऊ...

आहेत अनेक परंपरा
अर्थसंकल्पापूर्वीच्या अनेक परंपरा व प्रथा आहेत. कोणताही अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींचे अभिभाषण होते, ही पण एक पंरंपरा आहे. हलवा महोत्सवही एक परंपरा आहे. मंत्रालय व सरकार या सर्व परंपरांचे पालन व संचलन करते. यंदाचा अर्थसंकल्प हा शनिवारी सादर होणार आहे. विशेष म्हणजे शनिवार असूनही शेअर्स बाजार सुरु राहणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. अर्थसंकल्पात योजना आणि धोरणे जाहीर केली जातात. अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये अनेक ऐतिहासिक घोषणा केल्या गेल्या आहेत.
कोणते होते सर्वात लांब भाषण?
सर्वात लांब अर्थसंकल्पिय भाषण कोणते तर ते २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे. अर्थसंकल्पीय भाषणाच्या इतिहासात तेच भाषण आतापर्यंतचे सर्वात मोठे ठरले आहे. ते भाषण दिले होते, निर्मला सीतारमण यांनी. त्यावर्षी त्यांचे भाषण हे २ तास ४२ मिनिटे चालले होते. विशेष म्हणजे त्यावर्षी त्यांची तब्बेत खराब होती. त्यामुळे त्यांनी दोन तास ४२ मिनिटे भाषण करुन ते थांबवले व प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शेवटचे दोन परिच्छेद वाचून ते पूर्ण केले होते. निर्मला सीतारामन यांचे हेच भाषण आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठे भाषण राहिले आहे. विशेष म्हणजे निर्मला सीतारामन यांनी पहिले अर्थसंकल्पिय भाषण २०१९-२० मध्ये दिले होते. तेही २ तास १७ मिनिटे चालले होते.
सर्वात लहान भाषण कोणते?
अर्थमंत्री हिरुभाई पटेल यांनी १९७७-७८ मध्ये फक्त ८०० शब्दांचे सर्वात लहान अर्थसंकल्पीय भाषण दिले. हे भाषण अंतरिम अर्थसंकल्पाचा भाग म्हणून देण्यात आले होते. तेच ८०० शब्दांचे भाषण अर्थसंकल्पाच्या इतिहासातील सर्वात लहान भाषण ठरले आहे. हा रेकाँर्ड हिरुभाई पटेल यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.












Click it and Unblock the Notifications