Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

When is Muharram 2025 holiday :मोहरम् कधी आहे? या दिवसाची सुट्टी 6 जुलै की, 7 जुलैला? जाणून घ्या

When is Muharram 2025 holiday July 6 or 7 : इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना म्हणजे 'मुहर्रम' (मोहरम्) हा रमजान महिन्यानंतरचा दुसरा सर्वात पवित्र महिना आहे. यंदा मोहरम् जुलै महिन्यात आहे. अनेकजण म्हणतात की, यंदा मोहरम् ६ जुलैला तर काहीजण म्हणतात की, ७ जुलै रोजी असेल. त्यामुळे तारखेबद्दल लोकांमध्ये थोडासा सम्रंभ आहे, पर्यायाने सुट्टी नेमकी ६ कि ७ जुलैला याचाही सम्रंभ निर्माण झाला आहे.

When is Muharram 2025 holiday

मोहरम् महिन्याच्या १० व्या दिवसाला आशुरा म्हणतात, जो खूप महत्वाचा आहे, कारण या दिवशी जगभरातील मुस्लिम बांधव शोक करतात, म्हणूनच 'मुहर्रम' हा आनंदाचा सण मानला जात नाही, तर दुःखाचा दिवस मानला जातो. शिया आणि सुन्नी दोन्ही समुदाय हा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. यावर्षी मोहरम महिना २७ जून २०२५ पासून सुरू झाला आहे. त्यानंतर या महिन्याच्या दहाव्या दिवशी मोहरम ६ जुलै २०२५ रोजी येत आहे.

या दिवशी मिळणार सुट्टी

मुहर्रमचा १० वा दिवस, आशुरा, रविवार, ६ जुलै रोजी येत आहे. भारतात २६ जून रोजी चंद्रकोर दिसली आणि मस्जिद-ए-नाखोदा मरकझी रुयत-ए-हिलाल कमिटीनुसार, २७ जून रोजी मोहरम-उल-हरमचा पहिला दिवस सुरू झाला. राजपत्रित सुट्ट्यांच्या यादीनुसार, मोहरम ६ जुलै रोजी येतो. आशुरा रविवारी असल्याने, या दिवशी सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका आणि कार्यालये आणि शाळा बंद राहतील.

मोहरमचे धार्मिक महत्त्व

मोहरम हा इस्लाममधील चार पवित्र महिन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये युद्ध निषिद्ध आहे. अल्लाहने या महिन्याला विशेष दर्जा दिला आहे. या दिवशी पैगंबर मुहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांनी न्याय आणि सत्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या कुटुंबासह आणि साथीदारांसह आपले प्राण अर्पण केले.

करबलाची घटना

इ.स. ६८० मध्ये, यजीद नावाच्या शासकाकडून इस्लामी मूल्यांचे उल्लंघन होत होते. हजरत इमाम हुसेन यांनी त्यांचे अन्याय्य शासन स्वीकारले नाही आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठवला. इमाम हुसेन आणि त्यांच्या ७२ अनुयायांना करबलाच्या मैदानात उपाशी आणि तहानलेले ठेवून शहीद करण्यात आले. ही घटना मानवता, न्याय आणि बलिदानाचे प्रतीक बनली.

Disclaimer : ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या श्रद्धा आणि माहितीवर आधारित आहे. वनइंडिया लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पुष्टी करत नाही, म्हणून कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया एखाद्या जाणकार एक्पर्टचा सल्ला घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+