बाॅल समजून बाँम्ब उचलला, खेळता खेळता स्फोट! दोन मुलं जखमी; 'या' शहरात घडली धक्कादायक घटना
West Bengal Murshidabad News : बाॅल समजून बाँम्ब उचलला अन् खेळला! स्फोट झाल्याने दोन मुलं जखमी; 'या' शहरात घडली धक्कादायक घटना पश्मिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटचा बॉल समजून मुलाने चक्क गावठी बाँम्ब उचललाला. ज्याचा स्फोट झाला असून त्यात दोन मुलं जखमी झाली आहेत.
दरम्यान य़ा स्फोटाच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर दुसरीकडे वेगळीच अफवा पसरली. त्यामुळे पोलिसांनी घटनेची माहिती देत अफवांवर विश्वास न ठेवू नये असे सांगितले आहे.

कुठे आणि काय घडली नेमकी घटना?
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमशेरगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत उत्तर मोहम्मदपूर हा भाग आहे. येथे ही घटना घडली आहे. या परिसरात आज 16 एप्रिल 2025 रोजी काही मुलं खेळत होती. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मुलं मैदानात खेळताना त्यांना एक संशयास्पद वस्तू आढळली, जी त्यांना बॉल वाटली त्यामुळे त्यांनी त्या वस्तूशी खेळायला सुरुवात केली. खेळता खेळता अचानक स्फोट झाला तेव्हा समजले की, तो चेंडू नव्हता, गावटी बनावटीचा बाँम्ब होता हे...
दोन मुलं जखमी, उपचार सुरु
दरम्यान, मुर्शिदाबाद शहरात आज झालेल्या या स्फोटात दोन मुलं जखमी झाले आहेत, या दोघांनाही घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत दोन्ही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
काय म्हणाले पोलिस?
नुकतेच 11 एप्रिल रोजी मुर्शिदाबादच्या समशेरगंज भागात वक्फ कायद्याच्या विरोधात आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला. तेव्हापासून या शहरात तणावाची स्थिती आहे. पोलिसांची गस्तही अद्याप या भागात असतानाच ही अपघाताची घटना घडली. त्या पार्श्वभुमीवर या संपूर्ण प्रकरणाबाबत जंगीपूर पोलिसांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले आहे.
स्फोटाची घटना हा एक अपघात
स्फोटाची घटना हा एक अपघात आहे आणि त्याचा कोणत्याही जातीय तणावाशी संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या घटनेकडे अपघात म्हणून पाहावा इतर ज्याही अफवा असतील त्याकडे लोकांनी लक्ष देऊ नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा : वक्फ कायद्याच्या निषेधार्थ मुर्शिदाबादेत काढलेल्या मोर्चात हिंसाचार; पोलिसांवर दगडफेक-वाहने जाळली
हेही वाचा : पुतिन यांच्या ताफ्यातील कारमध्ये स्फोट; अपघात की पुतिन यांच्या हत्येचा होता कट?, पाहा- थरारक VIDEO
हेही वाचा : एलओसीजवळ स्फोट; दोन जवान शहीद, लष्कराने तातडीने नाकाबंदी करत राबवविले सर्च ऑपरेशन












Click it and Unblock the Notifications