वक्फ कायद्याच्या निषेधार्थ मुर्शिदाबादेत काढलेल्या मोर्चात हिंसाचार; पोलिसांवर दगडफेक-वाहने जाळली
West Bengals Murshidabad Violence : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच वक्फ दुरुस्ती कायद्यावर सही केली. त्यानंतर काही पक्ष व संघटनांनी कोर्टात धाव घेतली. दरम्यान, वक्फ दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभरात निषेध देखील केला जात आहेत.
अशातच पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याच्या विरोधात शुक्रवारी झालेल्या निदर्शनादरम्यान पोलिस आणि निदर्शकांमध्ये वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर वाहनांची जाळपोळ केली.
जंगीपूर परिसरात झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. वक्फ विधेयकाविरोधात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी करत निदर्शने केली.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, मग पोलिसांनी...
आंदोलकांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा हाणामारी सुरू झाली. परिस्थिती इतकी बिकट झाली की आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या पेटवून दिल्या. अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि लाठीचार्ज करावा लागला.
West Bengal: People hold protest against Waqf law in Murshidabad. Protest turned violent as they allegedly vandalized police vehicle and set it on fire.#WaqfAmendmentAct #WestBengal pic.twitter.com/p2d5QMY6GW
— Raajeev Chopra (@Raajeev_Chopra) April 8, 2025
या चकमकीत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे, ज्यात काही पोलिसांचाही समावेश आहे. या चकमकीनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे, तर निदर्शकांनी स्पष्ट केले आहे की वक्फ दुरुस्ती विधेयक मागे घेईपर्यंत त्यांचा निषेध सुरूच राहील.
The West Bengal Police is struggling to rein in the violent Islamist mob rampaging through the streets of Murshidabad—possibly under instructions from Home Minister Mamata Banerjee herself. Her inflammatory speeches have directly contributed to the current unrest.
— Amit Malviya (@amitmalviya) April 8, 2025
As a so-called… pic.twitter.com/vKKVabeMnl
वक्फ कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेल्या वक्फ (सुधारणा) विधेयक 2025 ला शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिली.
या संदर्भात राजपत्र अधिसूचना जारी झाल्यानंतर, वक्फ कायदा, 1995 चे नाव बदलून युनिफाइड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट (UMEED) कायदा, 1995 असे करण्यात आले आहे.
दरम्यान, अनेक मुस्लिम संघटना आणि विरोधी नेते या कायद्याला विरोध करत आहेत. या क्रमाने, वक्फ कायद्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत सहा याचिका दाखल झाल्या आहेत.
यावर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. वक्फ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिकांवर सुनावणी करण्यास न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. तथापि, सुनावणीसाठी अद्याप कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications