एलओसीजवळ स्फोट; दोन जवान शहीद, लष्कराने तातडीने नाकाबंदी करत राबवविले सर्च ऑपरेशन
जम्मू काश्मिरच्या नियंत्रण रेषेजवळ आईडी स्फोटात दोन जवान शहिद झाले. कायम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या अखनूर सेक्टरजवळच्या भट्टल परिसरात हा स्फोट झाला. लष्कराचे जवान गस्त घालत असताना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान हा ब्लास्ट झाला. त्यात दोन जवान शहिद झाले. स्फोटानंतर या संपूर्ण परिसराची घेराबंदी करण्यात आली.

सुरुंग केला निष्क्रीय
अखनूर येथे स्फोट झाल्यानंतर घेराबंदी करण्यात आली. त्यानंतर त्याच परिसरात एक मोर्टार शेल सापडला. या शेलला बॉम्बनाशक पथकाने निष्क्रिय केले. नामंदर गावाजवळील प्रतापनगर ओढ्यात हा मोर्टारशेल अर्थात सुरुंग गोळा सापडला.
अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न
गेल्या महिन्यांपासून जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी अनेकदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. त्याचा सुगावा लागताच सतर्क जवानांनी मोर्चा सांभाळत घुसखोरीचा डाव हाणून पाडला. लष्कराने कश्मीर झोनच्या बारामुल्ला येथे शस्रास्र आणि दारुगोळा जप्त केला. तीन एके - ४७ रायफल, ११ मॅगझिन, २९२ काडतूस, एक अंडर बॅरल ग्रेनेड लाँचर, नऊ ग्रेनेड आणि अनेक हँड ग्रेनेड त्या कारवाईत जप्त केले होते. आता स्फोटात दोन जवान शहीद झाल्यानंतर लष्कराने अतिरेक्यांविरूद्धच्या कारवाया आणखी तीव्र केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications