Vinayak Chaturthi 2025: आज विनायक चतुर्थी! तुमची कामे करण्याआधी या 3 गोष्टी करा, होईल मनोकामना पूर्ण
Vinayak Chaturthi 2025 : विनायक चतुर्थी हा दिवस आत्म-चिंतन आणि आत्म-सुधारणेची संधी देणारा दिवस आहे. त्यामुळे केवळ उपवासच नाहीतर मनशुद्धीचा दिवस आहे आणि व्यक्तिमत्व, गुणवृद्धीचा दिवस आहे. तुमचे जुने दोष, चुका किंवा आळशीपणा सोडून देण्याचा संकल्प करून तुम्ही स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवण्याच्या दिशेने आजपासून काम करू शकता. गणपतीची उपासना करण्यापुर्वी घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या.
आपण कोणत्याही कामाला सुरुवात गणपती पुजनाने करतो त्याला आपण श्रीगणेशाही म्हणतो. श्रीगणेशाचा आशीर्वाद आणि कृपा यामुळे कामात सहजता येते आणि अडचणी दूर होतात म्हणूनच गणेशाला विघ्नहर्ता म्हटले आहे.

पुजेआधी मन शुद्ध करा
श्रीगणेशाच्या उपासनेमध्ये भक्ती आणि श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. ते आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, ताकद, समृद्धी आणि आनंद आणण्याचे प्रतीक आहेत. पूजा करताना, ही भावना तुमच्या मनात ठेवा की तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आणि अडथळे दूर करायचे आहेत.
वाणी आणि कृतीवर संयम ठेवा
गणेश चतुर्थीचा उपवास करताना फक्त उपवास करणे म्हणजे आराधना नाही तर तुम्ही कसे बोलता, तुमचा आचार विचार काय आहे. तुमची वाणी कशी आहे हेही महत्वाचे असते त्यामुळे मनासोबतच कृतीवर संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. या दिवसात, नकारात्मक विचारांपासून शक्य तितके दूर राहा आणि प्रत्येक परिस्थितीत संयम राखा. सद्वविचार नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करतात.
काम करण्याआधी आराधना नंतर चांगल्या कामाचा श्रीगणेशा करा
जर तुम्ही कोणतेही मोठे काम किंवा प्लॅन आखत असाल तर ते करण्यापुर्वी आजचा विनायक चतुर्थीचा दिवस खूप महत्वाचा आहे. तुमची कामे करण्यापुर्वी लक्षात ठेवा की, गणेशाची आराधना करायची आहे. गणपती बप्पा विघ्नहर्ता आहे. त्याची आराधना करताना सर्व विघ्न दूर होतील..ही भाविकांत श्रद्धा आहे.
विनायक चतुर्थीचा शुभ मुहूर्त
- विनायक चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4:39 वाजता सुरू होईल. हे 5:25 पर्यंत चालेल.
- विजय मुहूर्त दुपारी 2:10 वाजता सुरू होईल. हे 3:20 पर्यंत चालेल.
- गोधूलीचा मुहूर्त संध्याकाळी 6:38 वाजता सुरू होईल. हे संध्याकाळी 7:01 पर्यंत चालेल.
- निशिता मुहूर्त दुपारी 12.01 वाजता सुरू होईल. हे 12:48 पर्यंत चालेल.
पूजा कशी करायची - पद्धत
- संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, ब्रह्म मुहूर्तावर उठा आणि स्नान केल्यानंतर, मंदिर स्वच्छ करा.
- यानंतर, सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.
- पाटावर एक कापड पसरुन गणपतीची मूर्ती स्थापित करा. यानंतर, त्यांना फुले, सुगंध आणि दिवा अर्पण करा.
- दिवा लावा आणि आरती करा आणि गणेश चालीसा या मंत्रांचा पाठ करा.
- गणपतीला प्रिय असलेले मोदक किंवा तिळाचे लाडू अर्पण करा.
- "ओम श्री गणेशाय नमः" या मंत्रांचा शुद्ध प्रेम आणि भक्तीने जप करा, जेणेकरून त्यांचा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल.
- संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करून उपवास सोडावा. या दिवशी दान करणे शुभ मानले जाते.












Click it and Unblock the Notifications