vinayaka chaturthi 2025 : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती.!', विनायक चतुर्थीच्या द्या खास शुभेच्छा!
Vinayaka chaturthi 2025, Wishesh shubhechha in marathi Image Photo : हिंदू पंचागानुसार, वैशाख विनायक चतुर्थी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. ही तिथी भगवान गणेशाला समर्पित आहे आणि तिला गणेश चतुर्थीचे मासिक रूप देखील म्हणतात. हा दिवस गणरायाच्या पूजेसाठी विशेषतः शुभ मानला जातो.

या दिवशी उपवास करून गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. हे आनंद, समृद्धी, ज्ञान आणि बुद्धी प्रदान करणारे मानले जाते. भगवान गणेश हे सर्व अडथळे आणि दुःख दूर करणारे देव आहेत, म्हणून या दिवशी त्यांची पूजा करणे विशेष फलदायी आहे. 1 मे 2025 रोजी विनायक चतुर्थी असून तुम्ही विनायक चतुर्थीचे शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता. ते पुढील प्रमाणे आहे.

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये ॥
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका |
भक्तिने स्मरता नित्य आयु:कामार्थ साधती ||
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव सर्वांना...
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

वक्रतुण्ड महाकाय
सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव
सर्वकार्येषु सर्वदा ।।
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश।
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति। मेरे कर दूर क्लेश।।
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

प्रारंभी विनंती करू गणपति विद्यादया सागरा ।
अज्ञानत्व हरोनी बुद्धी मती दे आराध्य मोरेश्वरा ||
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहु तोषवी |
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

मोरया मोरया गोड हे नाम तुझे |
कृपा सागरा हेची माहेर माझे ||
तुझी सोंड बा वाकुडी एकदंता |
मला बुद्धी दे मोरया गुणवंता ||
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

सुख समृद्धीसाठी प्रार्थना माझी तुझ्या चरणी,
हात जोडूनी क्षमा मागतो कळत नकळत झालेल्या चुकांची,
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

"बाप्पा तुझा हात सदैव
आमच्या माथी असू दे,
तुझी साथ जन्मोजन्मी
पाठीशी असू दे,
आनंद येऊ दे घरी,
प्रत्येक कामात यश मिळू दे..
गणपती बाप्पा मोरया,
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

चला गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करूया
चतुर्थी उत्सवानिमित्त प्रियजणांना शुभेच्छा देऊया
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

तुमचे जीवन उत्तम आरोग्य,
समृद्धी आणि यशाने भरले जावो
हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

सर्व मांगल्य मांगल्ये,
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी,
नारायणी नमोस्तुते
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा !

हार फुलांचा घेऊनी वाहू चला हो गणपतीला
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पुजन करुया गणरायाचे
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा












Click it and Unblock the Notifications