Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

उपराष्ट्रपती निवडणुकीवरून राजकारण तापलं; एनडीए विरुद्ध इंडिया ब्लॉक, कोण जिंकणार?

Vice President Election 2025 NDA vs INDIA Block VP polls : सध्या देशाचे राजकीय वातावरण उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीने तापले आहे. 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी बाकावरील 'इंडिया ब्लॉक' या दोघांनीही आपली रणनीती आखणे सुरू केलेली आहे. दोन्ही बाजूंनी आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बड्या नेत्यांकडून सर्व खासदारांची भेटी घेतल्या जात आहेत.

Vice President Election 2025

प्रमुख उमेदवार, काय आहे पक्षांची रणनीती

एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. दुसरीकडे, विरोधी 'इंडिया ब्लॉक'ने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे.

एनडीएने आपल्या खासदारांना निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपने आपल्या खासदारांसाठी जेवणाचे आयोजन केले असून, कार्यशाळा घेऊन निवडणुकीची प्रक्रिया समजावून सांगितली जात आहे.

त्याचबरोबर ८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एनडीएच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करणार आहेत. विशेष बाब म्हणजे, भाजपने 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना दुसरा कार्यकाळ न देण्याची ऐतिहासिक चूक' दुरुस्त करण्याचे आवाहनही तामिळनाडूच्या विरोधी पक्षांना केले आहे.

याउलट, 'इंडिया ब्लॉक'ने 6 सप्टेंबर रोजी व्हर्च्युअल बैठक घेतली, ज्यात निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. ८ सप्टेंबर रोजी खासदारांसाठी मॉक पोल (सराव मतदान) आयोजित करून मतदान प्रक्रिया समजून दिली जाणार आहे.

संसदेतील संख्याबळ : कोणाचे पारडे जड?

उपराष्ट्रपती निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे एकूण ७८२ खासदार मतदान करणार आहेत.

एनडीए (NDA)

भाजपचे लोकसभेत २९३ आणि राज्यसभेत १३४ खासदार आहेत. मित्रपक्षांसह एनडीएचे एकूण संख्याबळ ४२७ पर्यंत पोहोचते. वायएसआर काँग्रेसनेही (११ खासदार) एनडीएला पाठिंबा जाहीर केल्याने एनडीएचा आकडा ४३८ वर पोहोचतो.

इंडिया ब्लॉक (INDIA Block)

विरोधकांकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून सुमारे ३१२ खासदार आहेत. 'आप' (११ खासदार) सोबत आल्यास हा आकडा ३२३ पर्यंत जाऊ शकतो.

या आकडेवारीनुसार, एनडीएचे पारडे स्पष्टपणे जड दिसत आहे. तरीही, विरोधी पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

उपराष्ट्रपतीपदाची मतदान प्रक्रिया

भारतीय राज्यघटनेच्या कलम ६६ (१) नुसार, उपराष्ट्रपतीची निवड 'प्रमाणशीर प्रतिनिधित्व प्रणाली' आणि 'एकल हस्तांतरणीय मत पद्धती' (Single Transferable Vote) द्वारे केली जाते. या पद्धतीत...

  • प्रत्येक खासदाराला उमेदवारांच्या नावापुढे पसंतीक्रम (१, २, ३...) लिहावा लागतो.
  • पहिला पसंतीक्रम देणे अनिवार्य आहे, तो न दिल्यास मतपत्रिका अवैध ठरते.
  • निवडणूक आयोग मतदान करण्यासाठी एक विशेष पेन देतो आणि त्याच पेनचा वापर करणे बंधनकारक आहे, अन्यथा मत अवैध ठरते.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+