Vat purnima 2025 : वट सावित्री पौर्णिमेनिमित्त मित्र-मैत्रिणी, प्रियजनांसाठी टाॅप 10 शुभेच्छा संदेश
Vat Savitri Purnima 2025 shubhechha sandesh wishes in in marathi : मकरसंक्रांतीनंतरचा महिलांसाठीचा सर्वात महत्वाचा सण म्हणजे वटपोर्णिमा..सती सावित्रीच्या महनिय कार्यामुळे या दिवसाला वटसावित्री पौर्णिमाही म्हणतात. महाराष्ट्रात हा सण खूप मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. महिला वडाला प्रदक्षिणा घालून पुजा-अर्चा करुन उपवासही करतात. या सणाला खास पौराणिक महत्व आहे आणि त्यावरच हा सण आधारलेला आहे.
हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमधील विवाहित महिला ज्येष्ठ, शुक्ल पक्ष (चंद्राचा मेधा चरण) च्या पौर्णिमा तिथीला (पौर्णिमेचा दिवस) एक दिवसभर उपवास करतात. पती सत्यवानला मृत्युदेवता यम यांच्यापासून वाचवणारी सती सावित्रीच्या शौर्याचा, भक्तीचा आणि त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. वटवृक्षाची पूजा करुन महिला त्यांच्या पतीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात.

आज वटसावित्री पोर्णिमा या निमित्त आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. ते तुम्ही तुमच्या प्रियजन आणि मित्रांना तसेच मैत्रिणींना शेअर करु शकता आणि त्यांना मंगल आरोग्यासाठी आणि जीवनासाठी शुभेच्छा संदेश देऊ शकता.
मित्र आणि कुटुंबियांना वट सावित्री पौर्णिमा व्रताच्या शुभेच्छा-संदेश आणि कोट्स
1. तुम्हाला आणि तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभो, तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
2. तुमचा संसार वटवृक्षासारखा बहरो, ज्या पतीसाठी तुम्ही वडाला प्रदक्षिणा घालता, त्या तुमच्या पती परमेश्वराच्या आयुष्यात सतत ऊर्जा, सकारात्मकता आणि आर्थिक स्थेर्य लाभो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
3. वट सावित्री पोर्णिमेचा सण प्रत्येक महिलेसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण.. हा क्षण दररोज तुमच्या आयुष्यात येत राहो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
4. सत्यवान आणि सती सावित्रीसारखे नाते तुमचे आणि तुमच्या जोडीदारात नेहमी राहो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
5. वटसावित्री पौर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर तुमच्या जीवनात सदैव सुख आणि ऐश्वर्य नांदो, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण होवो हीच इश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
6. तुमचे जीवन वटवृक्षांसारखे विशाल आणि धनसंपदेने भरलेले राहो, सुदृढ आरोग्य लाभो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
7. तुमच्या सर्व व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रयत्नांमध्ये प्रगती होवो, वैवाहिक जीवनात सुखाची बरसात होवो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
8. सावित्री पौर्णिमा व्रताच्या निमित्ताने, भगवान ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव तुम्हाला त्यांच्या सर्वोत्तम आशीर्वादांनी बरसावेत. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
9. या वट सावित्री व्रताच्या पौर्णिमेच्या दिवशी, मी आशा करते आणि प्रार्थना करते की, देवी सावित्री आणि इश्वर तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना सदैव आशीर्वाद देत राहो. तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!
10. वटपोर्णिमेच्या दिवशी तुमच्या जीवनात आनंदाचा वटवृक्ष डौलत राहो. तुम्हाला हवे ते मिळावे, हीच माझी इश्वरचरणी मनोभावे मनोकामना, तुम्हाला वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!












Click it and Unblock the Notifications