Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kiss वाचवतो डाँक्टरची Fees! रोग प्रतिकारशक्ती वाढते, रक्ताभिसरण वाढते आणि, वाचा चुंबन घेण्याचे फायदे

सध्या प्रेमाचा आठवडा सुरु आहे. या आठवड्यातील 7व्या दिवशी म्हणजेच आज 13 फेब्रुवारीला किस डे साजरा होत आहे. या खास दिवसाला अनेकदा विरोध होत असला तरी, किस केल्याने काही आरोग्यदायी फायदेही होतात. चुंबनाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, हे आपण पाहूयात...

valentine day

किस डेचं महत्त्व

सध्या प्रेमाचा आठवडा सुरु आहे. अनेक जोडपी आनंदाने आणि प्रेमाने प्रपोज डे, टेडी डे असे दिवस साजरा करत आहेत. या प्रेमाच्या आठवड्यात कित्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवताना दिसतात. तर काही जण ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगतात. प्रपोज डे, टेडी डे, हग डे नंतर आज किस डे साजरा होत आहे. काही जण किसिंग म्हणजेच चुंबनाला अश्लील कृती मानतात. तर काहीजण ही प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असल्याचं मानतात. खरंतर 'किस डे' हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास असतो.

काय आहे महत्व?

नावाप्रमाणेच किस डे हा तुमच्या जोडीदारासोबतचा प्रेमसंबंध वाढवण्याचा दिवस आहे. तुमच्या जोडीदाराला प्रेमळ किस देऊन, तुम्ही तुमचे नाते केवळ मजबूत करत नाही तर ते स्पेशल आहे असे दाखवून देतात. हा दिवस तुमच्या नात्याला प्रेम, उत्कटता आणि आपुलकीने भरतो. किस हे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे, जो काहीही न बोलता तुमच्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो. यामुळे तुमचे नाते अधिक बंध मजबूत होतो आणि जवळीकतेची भावना निर्माण होते, असे काहींचे म्हणणे आहे.

valentine day

काय आहेत फायदे

- आरोग्य तज्ज्ञांच्या मते चुंबनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. किस करताना चेहऱ्याचे ३४ स्नायू आणि शरीराचे ११२ पोश्चर स्नायू सक्रीय होतात. या क्रियेमुळे हे सर्व स्नायू घट्ट राहण्यास मदत होते. किस केल्याने चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढते. त्वचा तरुणा आणि मुलायम होते. चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होतात.

- चुंबनामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो, असंही काही वैद्यकीय जनरलचं म्हणणं आहे. काँर्टिसाँल या संप्रेरकामुळे शरीरात तणाव तयार होतो. मात्र जेव्हा आपण चुंबन घेतो, मिठी मारतो तेव्हा मेंदूतील कोर्टिसोलची पातळी कमी होते. ऑक्सोटोसिन हार्मोन सोडले जातात. ज्यामुळे निद्रानाश व तणाव कमी होतो.

- रक्तदाब नियंत्रीत होतो, असंही काही वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चुंबन तज्ज्ञ एंड्रिया डिमर्जीयान यांच्या मते जेव्हा आपण चुंबन घेतो तेव्हा हृदयाची गती वाढते. रक्तवाहिनी प्रसरण पावतात. रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.

- कोलेस्ट्राँल कमी होतो असंही काहींच मत आहे. चुंबन घेतल्याने खराब काँलेस्ट्राँल पातळी कमी होते. हृदयरोग आणि स्ट्रेक येण्याचा संभव कमी होतो. चुंबन हे हृदयासाठी सर्वोतोपरी फायदेशिर असते असेही काहींचे मत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+