गृहमंत्री अमित शहांनी केले कुंभस्नान; साधू-महंतासोबत मारली डुबकी, पहा VEDIO

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. १३ जानेवारीपासून सुरु झालेल्या या कुंभमेळ्यात आत्तापर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले असल्याची माहिती, उत्तरप्रदेश सरकारने दिली. याच प्रयागराज येथी त्रिवेणी संगमात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही कुंभस्नान केले. आत अमित शहांबरोबर इतर ४६ लाख भाविकांनी स्नान केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Amit Shah took Kumbh bath

अमित शहांचे कुंभस्नान

गृहमंत्री अमित शहा हे आज सोमवारी महाकुंभ मेळ्यासह त्रिवेणी संगम स्नान तसेच इतर धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी स्नान करण्यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यानंतर कुंभमेळ्यातील आखाड्यात जात संत व महंतांचीही भेट घेतली. या सर्वांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी पवित्र संगमावर जाऊन डुबकी मारली.

शहांची साधूसंतांना भेट

यावेळी अमित शहा यांनी श्रृंगेरीचे शंकराचार्य भारती तीर्थ महाराज, पुरीचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती महाराज, द्वारकेचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर जुना आखाडा येथे महंत अवधेशानंद गिरी महाराज, गुरु शरणानंद महाराज आणि गोविंद गिरी महाराज यांचीही भेट व आशीर्वाद घेतले. त्यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनीही स्नान केले.

अखिलेश यांचेही स्नान

अमित शहा येण्यापूर्वी म्हणजेच काल रविवारी प्रयाग येथील त्रिवेणी संगमात उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही स्नान केले. येथील पवित्र त्रिवेणी संगमात त्यांनी ११ वेळी डुबकी मारली. आत्तापर्यंत साडेतेरा कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती यूपी सरकाने दिली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+