आंबटशौकिनांना धक्का! उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न ॲप्सवर केंद्र सरकारची बंदी
केंद्र सरकारने सॉफ्ट पॉर्न आशय (content) प्रसारित करणाऱ्या ॲप्स आणि वेबसाईटवर मोठी कारवाई केली आहे. यामुळे अनेक आंबटशौकिनांना चांगलाच धक्का बसला आहे. उल्लू (Ullu), एएलटीटी (ALTT), डेसिफ्लिक्स (Desiflix) आणि बिग शॉट्स (Big Shots) यांसारख्या सेमी-पॉर्न कंटेंट दाखवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर आता बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना (notification) जारी केली आहे.

तरुणाईवर वाढत्या प्रभावाला आवर घालण्याचा प्रयत्न
भारतात कोरोनाकाळात पॉर्न वेबसाईटवर बंदी घातल्यानंतर, विविध कंपन्यांनी सॉफ्ट पॉर्न कंटेंट दाखवण्यास सुरुवात केली होती. यामध्ये उल्लू ॲप आणि एएलटीटी (ALTT) सारख्या प्लॅटफॉर्मनी प्रचंड धुमाकूळ घातला होता. केवळ तरुण वर्गच नाही, तर अनेक वयोगटातील प्रेक्षकांना या ॲप्सने भुरळ घातली होती. यामुळे तरुण पिढीवर नकारात्मक परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. यावर कसे नियंत्रण मिळवावे, हा प्रश्न केंद्र सरकारसमोर होता आणि आता यावर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई
केंद्र सरकारने इंटरनेट सेवा पुरवठादारांना (Internet Service Providers) देशभरातील अशा प्रकारची सामग्री दाखवणाऱ्या २५ वेबसाईट आणि ॲप्स तात्काळ ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ७९(३)(ब) आणि आयटी नियम, २०२१ च्या नियम ३(१)(ड) नुसार कारवाई केली आहे. इंटरनेट प्रोव्हायडर्सना मध्यस्थ (Intermediaries) घोषित करण्यात आले असून, त्यांच्यावरच ही बंदी लागू करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बंदी घालण्यात आलेल्या ॲप्स आणि वेबसाईटची यादी:
- एएलटीटी (ALTT)
- उल्लू (Ullu)
- बिग शॉट्स ॲप (Big Shots App)
- डेसिफ्लिक्स (Desiflix)
- बूमेक्स (Boomex)
- नवरासा लाईट (Navrasa Lite)
- गुलाब ॲप (Gulab App)
- कंगन ॲप (Kangan App)
- बुल ॲप (Bull App)
- जलवा ॲप (Jalwa App)
- वॉव एंटरटेनमेंट (Wow Entertainment)
- लूक एंटरटेनमेंट (Look Entertainment)
- हिटप्राइम (Hitprime)
- फेनिओ (Fenio)
- शोएक्स (Showflix)
- सोल टॉकीज (Soul Talkies)
- अड्डा टीव्ही (Adda TV)
- हॉटएक्स व्हीआयपी (HotX VIP)
- हलचल ॲप (Halchal App)
- मूडएक्स (MoodX)
- निऑनएक्स व्हीआयपी (NeonX VIP)
- फुगी (Fuggy)
- मोजफ्लिक्स (Mojflix)
- ट्रायफ्लिक्स (Tryflix)












Click it and Unblock the Notifications