Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंतप्रधानांना अर्थसंकल्प कधी-कधी सादर करावा लागला? काय होती कारणे? वाचा रंजक माहिती

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प- २०२५ हा येत्या १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण या आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत असतो मात्र भारतीय राजकारणाच्या इतिहासात अनेकदा पंतप्रधानांनाही अर्थसंकल्प सादर करावा लागला होता.

Union Budget 2025

यंदाचा अर्थसंकल्प कधी?

यंदाचा म्हणजेच २०२५ चा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार याची माहिती अद्याप केंद्र सरकारने दिलेली नाही. मात्र तो १ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ११ वाजता सादर केला जाईल, अशी शक्यता जास्त आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण या अर्थसंकल्प सादर करतील. त्यांच्या अर्थसंकल्पातून अनेकांना अपेक्षा लागल्या आहेत. नवीन स्टार्टअप, युवा उद्योजक यांच्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प चांगला राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

निर्मलाजी करणार रेकाँर्ड

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यावेळी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विशेष म्हणजे सलग आठ अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री असणार आहेत. यापूर्वी हा रेकाँर्ड मोरारजी देसाई यांच्या नावावर होता. त्यांनी सलग सहा अर्थसंकल्प मांडले होते. मोरारजी देसाई यांनी एकूण दहा अर्थसंकल्प मांडले. तो रेकाँर्ड अजूनही त्यांच्याच नावावर आहे. मात्र त्यापैकी सहा अर्थसंकल्प त्यांनी सलग मांडले होते. तर दोन अर्थसंकल्प त्यानंतर काही वर्षांनी मांडले होते. त्यांनी दोन अंतरिम अर्थसंकल्पही मांडले आहेत.

पंतप्रधानांनी केलाय सादर

भारतीय राजकारणात काही वेळा पंतप्रधानांनाही अर्थसंकल्प सादर करावा लागल्याची उदाहरणे आहेत. सर्वात पहिल्यादा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५८ मध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. तत्कालीन अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांना एका घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागल्याने, पंतप्रधान नेहरुंनी तो सादर केला होता. त्यानंतर १९७० मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी १९६९ मध्ये राजीनामा दिल्यानंतर अर्थसंकल्पाची जबाबदारी इंदिराजींवर आली होती. या दोघांशिवाय पंतप्रधान राजीव गांधी यांनाही १९८७ मध्ये अर्थसंकल्प सादर करावा लागला होता. कारण त्यावेळी व्ही. पी. सिंग यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने ही जबाबदारी त्यांच्यावर आली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+