Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'ज्याचे कुटुंब दहशतवादी अफझल गुरूसाठी लढले, त्याला आम आदमी पक्षानं मुख्यमंत्री केलं- स्वाती मालीवाल

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी पक्षाला घरचा आहेर देणं सुरुच ठेवलं आहे. आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा झाली आणि आपच्या वरिष्ठ नेत्या आदिती मार्लेना यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागली. यावरुन आता त्यांच्यावर एकीकडे भाजप आणि दुसरीकडे काँग्रेसकडून टीका केली जात असतानाच आता स्वाती मालीवाल यांनीही यात उडी घेत आतिशीवर जोरदार टीका केली.

'ज्याचे कुटुंब दहशतवादी अफझल गुरूसाठी लढले, त्याला आम आदमी पक्षानं मुख्यमंत्री केलं. देव दिल्लीचे रक्षण करो. दिल्लीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखाचा आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

Swati Maliwal on Atishi Merloni

नेमकं काय म्हणाल्या स्वाती मालीवाल?

स्वाती मालिवाल म्हणाल्या, दिल्लीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे. आज एका महिलेला दिल्लीचे मुख्यमंत्री बनवले जात आहे, जिच्या कुटुंबानं दहशतवादी अफझल गुरूला फाशीपासून वाचवण्यासाठी दीर्घ लढा दिलायं.दहशतवादी अफझल गुरूला वाचवण्यासाठी तिच्या पालकांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज लिहिला होता.

स्वाती मालिवाल म्हणाल्या, आतिशी यांच्या पालकांच्या मते अफजल गुरू निर्दोष होता आणि त्याला राजकीय कटात गोवण्यात आलं होतं. आतिशी मार्लेना या फक्त 'डमी सीएम' असल्या तरी हा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. देव दिल्लीचे रक्षण करो असंही मालीवाल यांनी म्हटलं आहे.

आतिशी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यामागची 2 कारणे...

पहिले कारण

अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया तुरुंगात असताना पक्षाच्या बाजूने आणि अरविंद केजरीवाल तंसच मनीष सिसोदीया यांच्यासाठी ठाम भूमिका घेतली. स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाची शिफारस केली होती.

दुसरे कारण

2013 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आपचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीच्या त्या प्रमुख सदस्य होत्या. तेव्हापासून त्या पक्षाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

आतीशीवर काँग्रेसशी टीका

आतिशी यांच्या निवडीवरही काँग्रेसने हल्लाबोल केला. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले की, आम आदमी पार्टी हा लबाड आणि लुटमारीचा पक्ष आहे. 'आप'मध्ये केजरीवाल हेच सर्वस्व आहेत. जो येईल तो लुटणार. मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलून काही फरक पडणार नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+