UGC च्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; सरन्यायधीशांनी नोंदवले 'हे' महत्वाचे निरीक्षण
Supreme Court Stays UGC New Anti-Discrimination Rules 2026 : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नव्या भेदभावविरोधी नियमांविरोधात सुरू असलेल्या वादात आता सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आहे. 'वनइंडिया हिंदी'ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने UGC Equity Regulations 2026 च्या अंमलबजावणीवर तूर्तास स्थगिती दिली आहे. "या नियमांचा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याची दाट शक्यता आहे," असे निरीक्षण नोंदवत सरन्यायाधीशांनी या प्रकरणाच्या तातडीच्या सुनावणीला मंजुरी दिली आहे.

नेमका वाद काय आहे?
युजीसीने देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये 'समानता समित्या' स्थापन करणे अनिवार्य केले आहे. या समित्यांमध्ये OBC, SC, ST, महिला आणि दिव्यांग प्रतिनिधी असणे बंधनकारक आहे. मात्र, या रचनेत 'सामान्य प्रवर्ग' मधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावरून देशभरात संताप व्यक्त केला जात असून, हे नियम सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करणारे असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण
- प्रकरणाची सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी (CJI) स्पष्ट काही मुद्दे स्पष्ट केले.
- या नियमांची भाषा आणि प्रक्रिया अस्पष्ट आहे, ज्यामुळे त्यांचा गैरवापर होऊ शकतो.
- हा विषय देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असल्याने यावर सखोल चर्चा आणि कायदेशीर पडताळणी होणे आवश्यक आहे.
- जोपर्यंत या नियमांमधील त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत त्यावर स्थगिती कायम राहील.
राजकीय पडसाद आणि सरकारची भूमिका
या नियमांवरून राजकीय वातावरणही तापले आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आरोप केला की, UGC ने स्वतःच्याच काही महत्त्वाच्या शिफारसींकडे दुर्लक्ष केले आहे. दुसरीकडे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आश्वासन दिले आहे की, कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही आणि नियमांचा गैरवापर रोखण्यासाठी कडक पावले उचलली जातील.
काय आहे UGC प्रकरण?
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) २०२६ मध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये भेदभाव रोखण्यासाठी 'Equity Regulations' नावाचे नवीन नियम आणले आहेत, ज्यांतर्गत प्रत्येक कॉलेजमध्ये 'समानता समिती' स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीचे मुख्य काम कॅम्पसमध्ये जाती, धर्म किंवा लिंगावरून होणारा भेदभाव रोखणे हे आहे; मात्र वादाचे मुख्य कारण म्हणजे या समितीत SC, ST, OBC, महिला आणि दिव्यांगांना स्थान दिले असताना 'सामान्य प्रवर्ग' (General Category) वगळण्यात आला आहे.
यामुळे ही समिती निष्पक्ष नसेल आणि सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांवर खोटे आरोप किंवा अन्याय होऊ शकतो, असा दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीशांनी नियमांची भाषा अस्पष्ट असून त्यांचा गैरवापर होऊ शकतो, हे मान्य करत या नियमांच्या अंमलबजावणीला सध्या स्थगिती दिली आहे.












Click it and Unblock the Notifications