Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'लग्न होईपर्यंत मुलगा-मुलगी एकमेकांसाठी अजनबीच'; प्री-मॅरिटल सेक्सवर सुप्रीम कोर्टाची परखड टिप्पणी

Supreme court observation pre marital physical relation : "लग्नाचा कायदेशीर शिक्का मोर्तब होईपर्यंत मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी अनोळखी असतात. त्यामुळे लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवताना तरुणांनी अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी," अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.

न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुइयां यांच्या खंडपीठाने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी एका जामीन अर्जावर सुनावणी करताना ही तोंडी टिप्पणी केली.

Supreme court observation

नेमकं प्रकरण काय आहे?

एका ३० वर्षीय महिलेने एका व्यक्तीवर लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेची २०२२ मध्ये मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे आरोपीशी ओळख झाली होती. आरोपीने आपण अविवाहित असल्याचे सांगून महिलेशी जवळीक साधली. त्यानंतर दिल्ली आणि दुबईमध्ये तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. नंतर महिलेला समजले की, आरोपीचे आधीच लग्न झाले असून त्याने १९ जानेवारी २०२४ रोजी पंजाबमध्ये दुसऱ्या एका महिलेशी विवाह केला आहे.

या प्रकरणात आरोपीचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला होता, ज्याला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

न्यायालयाने काय म्हटले?

'वनइंडिया हिंदी'नुसार, सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

सावधगिरी आवश्यक: "लग्नाआधी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे महागात पडू शकते. लग्नाशिवाय लोक अशा शारीरिक संबंधांमध्ये कसे काय गुंततात, हेच न्यायालयाला समजत नाही," असे न्यायालयाने म्हटले.

दुबई प्रवासावर प्रश्न: सरकारी वकिलांनी जेव्हा सांगितले की दोघे लग्नाचा विचार करत होते, तेव्हा न्यायालयाने विचारले, "जर महिला लग्नाबाबत इतकी गंभीर होती, तर लग्नाआधी तिने दुबईला जायला नको होते."

तडजोडीचा पर्याय: प्राथमिक पाहणीत हा संबंध संमतीने झाले असल्याचे दिसत असल्याने, न्यायालयाने आरोपीला पीडित महिलेला नुकसान भरपाई देऊन प्रकरण मिटवण्याची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले.

कायदेशीर महत्त्व काय?

न्यायमूर्ती नागरत्ना यांनी यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्येही एक महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले होते की, "दीर्घकाळ चाललेला संमतीचा संबंध जर लग्नापर्यंत पोहोचला नाही, तर त्याला आपोआप बलात्कार मानले जाऊ शकत नाही." बलात्काराचा गुन्हा तेव्हाच लागू होतो जेव्हा संबंध जबरदस्तीने, भीतीपोटी किंवा दबावाखाली ठेवले जातात, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

प्री-मॅरिटल सेक्स (Pre-marital Sex) म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, जेव्हा दोन व्यक्ती लग्नाच्या बंधनात अडकण्यापूर्वी परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवतात, तेव्हा त्याला 'प्री-मॅरिटल सेक्स' असे म्हणतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+