लेकीच्या भविष्याची चिंता सोडा! 'सुकन्या समृद्धी' योजनेत गुंतवणूक करून उभारा ७२ लाखांचं भांडवल
SSY in marathi : प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं की आपल्या लाडक्या लेकीचं शिक्षण आणि लग्न कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय थाटात पार पडावं, त्यासाठी अनेकजण जीवाचे रान करतात, पै-पै गोळा करतात आणि आपल्या लेकीच्या समृद्धीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशी असतात. कालच २४ जानेवारीला, 'राष्ट्रीय बालिका दिन' पार पडला. अनेकांनी आपल्या मुलांचे मुलींचे स्टेट्स मोबाईलला ठेवले म्हणजेच तुम्ही तुमच्या मुलांप्रती खूप जागरुक आहात हे तुम्हीही जाणता.
..म्हणूनच भविष्य सुकर करण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या 'सुकन्या समृद्धी योजना' (SSY) तुमच्या लेकीसाठी एक सुरक्षित आणि श्रीमंत भविष्य घडवण्याची सुवर्णसंधी आहे. अवघ्या २५० रुपयांपासून सुरुवात करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी ७२ लाख रुपयांचा मोठा फंड कसा उभा करू शकता, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

सुकन्या समृद्धी योजना: ११ वर्षांचा यशस्वी प्रवास
'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेअंतर्गत २२ जानेवारी २०१५ रोजी सुरू झालेल्या या योजनेने नुकतीच ११ वर्षे पूर्ण केली आहेत. ही केवळ एक बचत योजना नसून मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्याचा पाया आहे.
७२ लाखांचा फंड कसा तयार होईल?
- सध्याच्या ८.२% वार्षिक व्याजदरानुसार, जर तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक केली तर गणित खालीलप्रमाणे असेल:
- वार्षिक गुंतवणूक: ₹१,५०,००० (कमाल मर्यादा)
- मासिक गुंतवणूक: ₹१२,५००
- गुंतवणुकीचा कालावधी: १५ वर्षे (पैसे फक्त १५ वर्षे भरायचे आहेत)
- मॅच्युरिटी कालावधी: २१ वर्षे
- एकूण गुंतवणूक: ₹२२,५०,०००
मिळणारी अंदाजित रक्कम: सुमारे ₹७१.८ लाख (७२ लाख रुपयांच्या जवळ) (टीप: जर भविष्यात सरकारने व्याजदर वाढवले, तर ही रक्कम ७२ लाखांच्या पुढेही जाऊ शकते.)
योजनेची खास वैशिष्ट्ये:
- १. उच्च व्याजदर: इतर बचत योजनांच्या (PPF किंवा FD) तुलनेत या योजनेत अधिक व्याज मिळते.
- २. टॅक्स फ्री (Tax Benefit): गुंतवणुकीची रक्कम, मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारा पैसा या तिन्ही गोष्टींवर 'कलम 80C' नुसार कोणताही कर (Income Tax) भरावा लागत नाही.
- ३. खाते उघडण्याचे वय: मुलगी १० वर्षांची होईपर्यंत हे खाते कधीही उघडता येते.
- ४. किमान गुंतवणूक: वर्षाला किमान २५० रुपये भरूनही तुम्ही खाते सुरू ठेवू शकता.
खाते कुठे आणि कसे उघडायचे?
- तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही अधिकृत बँकेत (उदा. SBI, ICICI, HDFC) जाऊन हे खाते उघडू शकता.
- आवश्यक कागदपत्रे: मुलीचा जन्म दाखला, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि निवासाचा पुरावा.
(Disclaimer : ही माहिती केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)












Click it and Unblock the Notifications