श्रावण महिना कधीपासून सुरु होणार! श्रावणात कोण-कोणते सण असतात अन् किती सोमवार येणार जाणून घ्या सर्व
Shravan When will start : श्रावण मासी हर्ष मानसी..असं काहीसं आपण श्रावण आला की गुणगुणत असतो.. ते उगाच नाही काही, त्याला कारण म्हणजे हा महिना खूपच आनंददायी असतो. या दिवसांत मस्त पाऊस पडतो आणि चहुबाजूनी धरती हिरवळीने नटलेली असते. अशा सुंदर आणि आल्हाददायक वातावरणाचा श्रावण सर्वांनाच हवाहवासा वाटतो.
जसा श्रावण महिना नैसर्गिकदृष्ट्या मोहून टाकतो तसे श्रावणातील सण, उत्सव आणि उपवास याला खूपच महत्व आहे.विशेषतः गोष्ट म्हणजे भगवान शिवांचा प्रिय वार असलेला सोमवार. आणि श्रावण महिन्यात या सोमवारला श्रावण सोमवार म्हणतात. या दिवशी ज्योतिर्लिंग ते गावकुसातील अन् आसपासच्या भगवान शंकराच्या मंदिरात आणि घरोघरी आराधना केली जाते उपवासही ठेवला जातो, म्हणूनच श्रावणाचे महत्व सर्व मराठी महिन्यात सर्वात जास्त आहे.

कधीपासून सुरु होतोय श्रावण महिना?
आनंद, मौज आणि सण घेऊन येणारा श्रावण हा महिना यंदा ११ जुलैपासून सुरू होत आहे आणि तो ९ ऑगस्ट रोजी संपेल. उपवास, पूजा, जलाभिषेक आणि विविध धार्मिक विधींद्वारे भक्त शिवाची पूजा या महिन्यात करतात. श्रावण महिना हा भक्ती, प्रेम, निसर्ग आणि परंपरांचा संगम आहे. या महिन्यात शिवाची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास संपतात आणि त्याला सुख, शांती आणि समृद्धी मिळते अशी धारणा जनमाणसांत आहे.
यंदा श्रावण सोमवार किती असणार?
- यावेळी श्रावण महिन्यात चार सोमवार येणार आहेत.
- पहिला श्रावण सोमवार - व्रत - १४ जुलै
- दुसरा श्रावण सोमवार -व्रत - २१ जुलै
- तिसरा श्रावण सोमवार - व्रत - २८ जुलै
- चौथा श्रावण सोमवार - व्रत - ०४ ऑगस्ट
श्रावण सोमवारचे धार्मिक महत्त्व काय आहे?
- श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे.
- विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशा धारणा आहे.
- महिला आणि पुरुष सावनच्या प्रत्येक सोमवारी उपवास करतात. असे मानले जाते की हे व्रत पद्धतशीरपणे पाळल्याने योग्य जीवनसाथी मिळतो आणि वैवाहिक जीवन आनंदी होते.
- श्रावण दरम्यान, देशभरातील लाखो कावडी गंगा नदीतून पाणी भरतात आणि जलाभिषेकासाठी शिव मंदिरांमध्ये जातात. असे मानले जाते की जो कोणी हे करतो त्याला विशेष शिवाचा आशीर्वाद मिळतो.
श्रावणातील विशेष व्रत आणि सण
श्रावणातील हरियाली तीज : हा सण विवाहित महिला साजरा करतात. त्या त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात.
नागपंचमी : श्रावण हा नाग देवाची पूजा करण्याचा एक खास दिवस आहे, जो जीवनातील संकटांपासून संरक्षण करतो.
रक्षाबंधन : श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेच्या दिवशी, बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटांवर रक्षासूत्र बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात.
पिठोरी अमावस्या : श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्या येते. या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा बैलांसाठी खास सण साजरा केला जातो. कर्नाटकात या सणाला बेंदूर असे म्हणतात.
श्रावण पुत्रदा एकादशी : या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो.
मंगळागौर : श्रावण महिन्यात मंगळागौर हा सण येतो. या दिवशी गौरी अर्थात महालक्ष्मीची आराधणा आणि उपवास केला जातो तसेच विशिष्ट पारंपारिक नृत्य आणि गाणी म्हटले जातात.
Disclaimer : ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या श्रद्धा आणि माहितीवर आधारित आहे. वनइंडिया लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पुष्टी करत नाही, म्हणून कोणतीही माहिती लागू करण्यापूर्वी, कृपया जाणकार ज्योतिषी किंवा पंडितांचा सल्ला घ्या.












Click it and Unblock the Notifications