Shravan Somwar 2025 Wishes In Marathi : श्रावण सोमवारनिमित्त द्या खास शुभेच्छा! 'हे' TOP 15 संदेश
Shravan Somwar 2025 Wishes In Marathi : श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना, या महिन्यात पावसाची संततधार तर असतेच पण निसर्गही हिरवाईने नटलेला असतो. अगदी प्रसन्न वातावरण जिकडे तिकडे या श्रावण महिन्यात असते, भक्तांची तर आराध्य दैवत महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात रिघ असते. अशा श्रावणाला 25 जुलैपासून सुरुवात होईल. श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून महिन्याची सुरुवात होणार असून, 23 ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला याचा समारोप होईल.
श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असलेला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. श्रावण सोमवारी शिवभक्त विशेष पूजा-अर्चा करून भगवान शंकराचा आशीर्वाद घेतात. या मंगलदिनी तुम्ही तुमच्या प्रियजनांना, मित्रपरिवाराला आणि कुटुंबीयांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही खास संदेश देत आहोत.

श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! (Shravan Somwar 2025 Wishes In Marathi)
1. "ॐ नमः शिवाय! श्रावण मासारंभ आणि पहिल्या श्रावण सोमवारच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. भगवान शंकराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो."
2. "महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा!"
3. "श्रावण सोमवारच्या या पवित्र दिवशी, भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. हर हर महादेव!"
4. "भोलेनाथाच्या कृपेने तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावो. पहिल्या श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!"
5. "श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी, भगवान शंकराच्या पूजनाने तुमच्या मनातील सर्व संकटे दूर होवोत. शुभ श्रावण सोमवार!"
6. "श्रावण महिन्याचा पहिला सोमवार, नव्या आशा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येवो. तुम्हाला सुखमय श्रावण सोमवारच्या शुभेच्छा!"
7. "या पवित्र श्रावण सोमवारी, तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान नांदो. हर हर महादेव!" श्रावण सोमवारच्या शुभेच्छा
8. "पहिला श्रावण सोमवार! या दिवसाची शांतता आणि पवित्रता तुमच्या जीवनात भरभरून येवो." श्रावण सोमवारच्या शुभेच्छा
9. "तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच शिवशंकराच्या चरणी प्रार्थना. श्रावण सोमवारच्या खूप शुभेच्छा!"
श्रावण सोमवार छोटे संदेश - Shrawan somwar Short Messages
11. "श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा! ॐ नमः शिवाय!"
12. "हर हर महादेव! पहिला श्रावण सोमवार तुम्हाला खूप फलदायी असो."
13. "शुभ श्रावण सोमवार! शिवकृपा लाभो." श्रावण सोमवारच्या शुभेच्छा
14. "जय भोलेनाथ! श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा."
15. "देवाधी देव महादेव तुम्हाला नेहमी आरोग्य, धनधान्य आणि सदैव आनंद देओ" श्रावण सोमवारच्या शुभेच्छा












Click it and Unblock the Notifications