Shravan somwar 2025:जुलै महिन्यातील पहिला सोमवार कधी आहे? तारीख, पूजा मुहूर्त अन् महत्त्व जाणून घ्या
Shravan somwar 2025: श्रावण महिना हा महादेवाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते. एवढेच काय तर बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी या स्थळी भाविकांच्या रांगा लागतात. अभिषेकापासून महापुजा आणि प्रसादापर्यंत या महिन्यात भक्तिभावाने वातावरण प्रसन्न झालेले असते. अशातच आता श्रावण महिना उद्या ११ जुलै २०२५ पासून सुरु होत आहे. त्यामुळे उपवासाचा महिना असल्याने भाविक श्रावण महिन्यातील सोमवार आणि शनीवार कधी आहे हे जाणून घेणे महत्वाचे मानतात.

श्रावण महिना का मानला जातो महत्वाचा
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. हा महिना सहसा जुलै-ऑगस्ट दरम्यान येतो. श्रावण महिना भगवान शिवांना समर्पित आहे आणि शिवभक्त संपूर्ण महिनाभर विशेष पूजा करतात. असे मानले जाते की या महिन्यात देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या करून शिव प्राप्त केला होता, म्हणून हा महिना शिवभक्तीसाठी सर्वोत्तम मानला जातो.
श्रावण सोमवार का महत्वाचा आहे?
या महिन्यात श्रावण सोमवारच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. कांवर यात्रा देखील श्रावणामध्ये होते, ज्यामध्ये शिवभक्त दूरदूरून गंगेचे पाणी आणतात आणि शिवलिंगावर अर्पण करतात. हिंदू धर्मात असे मानले जाते की जो कोणी हे व्रत भक्तीने पाळतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हे व्रत विशेषतः अविवाहित मुलींसाठी खूप शुभ मानले जातात, कारण त्यामुळे त्यांना योग्य वर मिळण्यास मदत होते अशी धारणा आणि समज आहेत.
हेही वाचा : Happy shrawan :
या वर्षाचा पहिला सोमवार कधी आहे?
या वर्षी श्रावण ११ जुलै ते ९ ऑगस्ट पर्यंत सुरू होत आहे.
श्रावणाचा पहिला सोमवार, म्हणजेच 'प्रथम श्रावणी सोमवार' १४ जुलै २०२५ रोजी आहे.
या वर्षीच्या श्रावण सोमवारच्या तारखा
- पहिला श्रावण सोमवार - १४ जुलै २०२५
- दुसरा श्रावण सोमवार - २१ जुलै २०२५
- तिसरा श्रावण सोमवार - २८ जुलै २०२५
- चौथा श्रावण सोमवार - ४ ऑगस्ट २०२५
पहिल्या सोमवारी शिवपूजन मुहूर्त
- ब्रह्म मुहूर्त - सकाळी ०४:११ ते ०४:५२
- अभिजीत मुहूर्त - सकाळी ११:५९ ते दुपारी १२:५५
- विजयी मुहूर्त - दुपारी २:०० ते दुपारी ०३:४० पर्यंत
- पहिल्या सावन सोमवारला जलाभिषेक वेळ -सावन सोमवारच्या ब्रह्म मुहूर्तासह, सूर्योदयानंतर पहाटे ५:०० ते दुपारपर्यंतचा वेळ शिवपूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो.












Click it and Unblock the Notifications