Shravan 2025: आजपासून श्रावण सुरु; श्रावण सोमवार कोणत्या तारखेला, पुजा-विधी, मुहूर्त सर्व जाणून घ्या
Shravan 2025 starts from today : आजपासून श्रावण महिना सुरु झाला असून शिवभक्तांच्या उत्साहाला मांदियाळी आली आहे. या महिन्यात शिवभक्तीला उधाण येते आणि सर्वत्र हर हर महादेवाचा गजर असतो तर दुसरीकडे या भक्तीत निर्सर्गही तल्लीन होऊन हिरवा शालू पांघरतो, सर्वत्र हिरवेगार निसर्गामुळे मनही प्रसन्न होते. या महिन्यात उपवासाला मोठे महत्व आहे आणि असंख्य भाविक उपवासही करतात तसेच मुहुर्तानुसार पुजाही करतात.
श्रावण अधिष्ठान आणि श्रावण मास पाळणाऱ्यांचीही मोठी संख्या असते. भगवान शंकराची श्रावणात विशिष्ट पुजाही केली जाते. आजपासून सुरु झालेल्या श्रावणात किती श्रावण सोमवार आहेत आणि पुजा कशी करावी, मुहूर्त काय हे आपण जाणून घेऊया.

पहिला सोमवार २८ जुलै रोजी
या वर्षी श्रावण महिना श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरु होत आहे. हा मुहूर्त २५ जुलै रोजी येत आहे तर २३ ऑगस्ट पर्यंत असेल. श्रावणाचा पहिला सोमवार, म्हणजेच 'प्रथम श्रावणी सोमवार' २८ जुलै २०२५ रोजी आहे.
या वर्षीच्या श्रावण सोमवार कोणत्या तारखांना आहे
- पहिला श्रावण सोमवार - २८ जुलै २०२५
- दुसरा श्रावण सोमवार - ४ ऑगस्ट २०२५
- तिसरा श्रावण सोमवार - ११ ऑगस्ट २०२५
- चौथा श्रावण सोमवार - १८ ऑगस्ट २०२५
आजचे पंचांग: शुक्रवार, २५ जुलै २०२५
आजची तारीख: २५-०७-२०२५, शुक्रवार
आजची तिथी: श्रावण
आजचे नक्षत्र: पुष्य
अमृतकाळ: सकाळी ०७:४८ ते ०९:२६
राहुकाळ: सकाळी ०७:४८ ते ०९:२६
सूर्य उदय: सकाळी ०६:१०:००
सूर्य अस्त: सायंकाळी ०७:१४:००
श्रावण महिन्यातील शिवामूठ
श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक सोमवारी विशिष्ट प्रकारची शिवामूठ वाहिली जाते:
- पहिला सोमवार: २८ जुलै २०२५ रोजी तांदूळ वाहावी.
- दुसरा सोमवार: ०४ ऑगस्ट २०२५ रोजी तीळ वाहावी.
- तिसरा सोमवार: ११ ऑगस्ट २०२५ रोजी मूग वाहावी.
- चौथा सोमवार: १८ ऑगस्ट २०२५ रोजी जव वाहावी.
श्रावणात अशी करा पुजा
दररोज शिवलिंगावर गंगाजल, दूध, मध, बेलपत्र आणि राखेने अभिषेक करा.
"ओम नमः शिवाय" हा शिव मंत्र जप करा.
श्रावणात सोमवार खूप फलदायी मानले जातात.
अविवाहित मुली चांगला वर मिळविण्यासाठी उपवास करतात, जर अविवाहित मुलींना चांगला वर हवा असेल तर त्यांनी श्रावण सोमवारी उपवास करावा.
सात्विक अन्न खावे.
गरिबांना दान करावे.
भगवान शिवाची स्तुती, आरती, शिवमहिम्ना स्तोत्र, रुद्राष्टक इत्यादींचे पठण करा.












Click it and Unblock the Notifications