आज श्रावण सोमवार, औंढा, त्र्यंबकेश्वरसह देशातील मंदिरात दर्शानासाठी अलोट गर्दी, व्हिडिओ बघा
Shravan 2025 Somwar today : आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असून आज पहाटे चारवाजेपासून राज्यातील विविध मंदिरात तसेच राज्यातील पाचही ज्योतिर्लिंगस्थळी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. हर हर महादेवचा गजर करत शिवमंदिरात आज दुपारपर्यंत लाखो भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले असून अभिषेकही केले जात आहेत.

तिसरे ज्योतिर्लिंग, नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविकांची गर्दी
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने बारा ज्योर्तिलींगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. श्रावणी सोमवारी मध्यरात्रीपासूनच गेादावरीचे उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षीणा करण्याची पद्धत आहे. त्यामुळे फेरीसाठी देखील गर्दी झाली आहे. सकाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.
२५ जादा बसेस सोडल्या
श्रावणी सोमवारनिमित्ताने राज्य परीवहन महामंडळाने २५ ज्यादा बस नाशिकमधील बस स्थानकातून सोडल्या आहेत. गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन करण्यासाठी नाशिक पेालीसांनी ड्रोनचा वापर केला आहे. मंदिर देवस्थानने देखील अति महत्वाच्या व्यक्तींसाठी असलेली (व्हीआयपी) दर्शन सुविधा बंद केली आहे.
आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे अलोट गर्दी
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी पहिल्याच श्रावणी सोमवारी तोबा गर्दी केली आहे . रात्री दोन वाजता शासकीय महापूजा व दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. आमदार संतोष बांगर , जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सपत्नीक दुग्धाअभिषेक केला.
राज्यासह परराज्यातून दर्शनासाठी गर्दी
मराठवाडा आणि विदर्भातील भाविकांनी रात्रीपासूनच दर्शनासाठी येथे मोठी गर्दी केली आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश , गुजरात, तेलंगणा , कर्नाटक ,वआंध्र प्रदेश आदि राज्यातूनही दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. श्री नागनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात झेंडू , निशिगंध, गुलाब , जरबेरा , शेवंती अशा विविध फुलांची आरास व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दर्शनासाठी देशभरातून शिवभक्तांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत .
अकोल्यात शेकडो वर्षांची ही परंपरा..
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथे मोठ्या श्रद्धेने कावडधारी पूर्णा नदीचे जल आणण्यासाठी गर्दी करतात आणि त्या जलाने जिल्ह्याचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वरा अभिषेक करतात. शेकडो वर्षे जुनी परंपरा आजही कायम आहे. या धार्मिक विधीसाठी रात्रीपासून भाविक गांधीग्राम येथे आले होते. संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमला होता. श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. या धार्मिक सोहळ्यामुळे गांधीग्राम परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला होता. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महसूल विभागाने नदीपात्रात बचाव पथक आणि पोलिस विभागातर्फे पोलीस दल तैनात करण्यात आले होते.
#WATCH मुंबई: सावन के तीसरे सोमवार के अवसर पर पूजा-अर्चना के लिए बाबुलनाथ मंदिर में बड़ी संख्या में श्रद्धालु उमड़े। pic.twitter.com/sFzaZGANW8
— ANI_HindiNews (@AHindinews) July 28, 2025
मुंबई - आज श्रावणातील पहिल्या सोमवारी प्रार्थना करण्यासाठी बाबुलनाथ मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमले होते.
#WATCH | Ayodhya, Uttar Pradesh | Devotees offer prayers at Kshireshwar Nath temple on the third Monday of the 'saavan' month. pic.twitter.com/Px8MqoiY4g
— ANI (@ANI) July 28, 2025
अयोध्या, उत्तर प्रदेश - 'श्रावण' महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविक अयोध्येतील क्षीरेश्वर नाथ मंदिरात प्रार्थना करताना
#WATCH | Varanasi, UP | Kashi Vishwanath Temple Administration and District Administration shower flower petals on devotees lined up outside the temple.
— ANI (@ANI) July 28, 2025
(Source: Kashi Vishwanath Mandir) pic.twitter.com/CMk1hZLjyf
वाराणसी, उत्तर प्रदेश - काशी विश्वनाथ मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने मंदिराबाहेर रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला.












Click it and Unblock the Notifications