मृत्यूच्या 7-8 दिवस आधी शरीर देते ‘हे' 5 संकेत? सावध राहा! अन्यथा शेफालीसारखं घडू शकतं
'कांटा लगा' गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या आकस्मिक मृत्यूने संपूर्ण देश हादरला आहे. 42 वर्षीय शेफाली अत्यंत फिट आणि तंदुरुस्त होत्या, त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी अनपेक्षित आणि दुःखद ठरली. शेफालीच्या मृत्यूचं कारण कार्डियाक अरेस्ट म्हणजेच हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगण्यात आलं आहे.

शेफाली एकट्या नाहीत, अनेक प्रसिद्ध व्यक्तींना झाला हृदयविकाराचा झटका
केवळ शेफालीच नाही, तर त्याआधीही सिद्धार्थ शुक्लासारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचा मृत्यू अचानक हृदयविकाराने झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, "हृदयविकार येण्याआधी 7-8 दिवस आधीच शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असतं."
काय आहेत हे 5 लक्षणं?
- व्हायरल व्हिडिओत आणि डॉक्टरांच्या मते, खालील लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा धोका होऊ शकतो:
- अचानक थकवा जाणवणे
- हृदयाच्या धडधडीत असामान्य वाढ
- रक्तदाब कमी होणे (Low BP)
- प्रचंड घाम येणे, विशेषतः विश्रांतीच्या वेळी
- श्वास घेण्यास त्रास
या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास, शेफाली जरीवालासारखी आकस्मिक स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यात फरक आहे
डॉ. एमएच युसुफ अन्सारी, कार्डिओलॉजिस्ट (बलरामपूर हॉस्पिटल, लखनऊ) यांनी OneIndiaHindi ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं की, "कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयाचे ठोके अचानक थांबणे. या अवस्थेत माणूस अचानक बेशुद्ध होतो. तर हार्ट अटॅकमध्ये हृदयाच्या मांसपेशींना पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे नुकसान होते. त्यामुळे दोघांमध्ये फरक आहे."
वेटलॉससाठी वापरले जाणारे पावडर आणि तासन्तास जिम किती सुरक्षित?
या प्रश्नावर उत्तर देताना डॉ. अन्सारी म्हणाले की, "पावडर, सप्लिमेंट्स वगैरे आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. सोशल मीडियावरून बघून कोणतीही गोष्ट वापरणं धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांचा सल्ला न घेता काहीही घेऊ नये."
"सामान्य व्यक्तींनी जिममध्ये तासन्तास घालवण्यापेक्षा योगा, ब्रिस्क वॉक किंवा एरोबिक्स यावर भर द्यावा. खूप जड व्यायाम टाळलेला चांगला."
शेफाली जरीवालाच्या मृत्यूमुळे हृदयविकारावर पुन्हा चर्चा
27 जूनच्या रात्री शेफाली यांची तब्येत अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील बेलेव्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कार्डियाक अरेस्ट हे त्यांचं संभाव्य मृत्यूचं कारण सांगितलं जातंय. मात्र, अधिकृत पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणं बाकी आहे.
शेफाली जरीवालाच्या मृत्यूने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं की फिटनेसच्या आड आरोग्यदायक जीवनशैली लपलेली असतेच असं नाही. आपल्या शरीराकडून मिळणाऱ्या सूचनांकडे वेळेत लक्ष देणं आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच आरोग्य टिकवण्याचं खरं गमक आहे.












Click it and Unblock the Notifications