Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'बाकी का हिसाब खुदा करेगा', पाचव्यांदा गरोदर असलेल्या सीमा हैदरवर पहिल्या पतीने काढला राग!

Seema haider pregnancy : भारतातील सचिन मीना याच्याशी लग्न करणारी पाकिस्तानची सीमा हैदर आता पाकिस्तानातून यूपीत आली असून ती पाचव्यांदा आई होणार आहे. अलीकडेच सीमा हैदर आणि सचिन मीना यांनी एक गोड बातमी शेअर केली आहे, ज्यानंतर पाकिस्तानमध्ये राहणारे सीमाचे पहिले पती गुलाम हैदर यांनी संताप व्यक्त केला आहे.

पती गुलाम हैदर यांनी एका व्हिडिओद्वारे सीमा हैदर गर्भवती झाल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. ग्रेटर नोएडातील रहिवासी सचिन मीना याच्या प्रेमात चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात दाखल झालेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ऑनलाइन गेम PUBG द्वारे सचिनसोबत सुत जुळालेली सीमा सध्या प्रेग्नंट आहे, याचा खुलासा तिने तिच्या एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे.

Seema haider pregnancy

सीमा हैदरने शेअर केली गुड न्यूज

व्हिडिओच्या सुरुवातीला सीमा हैदर खूपच अस्वस्थ दिसत होती. ती म्हणाली की तिला चक्कर आणि मळमळ होत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जातो, ती गर्भधारणा चाचणी दाखवते, ज्यात तिच्या गर्भधारणेची खात्री होते. व्हिडिओमध्ये सचिन मीनाही हे ऐकून खूप खुश दिसत आहे.

हेही वाचा : 3 वेळा लग्न तरीही अनुप जलोटा बाशिंग बाधणार? चौथ्या लग्नाबाबत म्हणाले-'माझी पत्नी म्हणाली अफेअर ठेवा

पती गुलाम हैदरला धक्का बसला

सीमा हैदर गरोदर असल्याची बातमी पाकिस्तानात असलेला तिचा पहिला पती गुलाम हैदरपर्यंत पोहोचली आहे, त्यानंतर गुलाम हैदरने एका व्हिडिओद्वारे सीमा आणि सचिनवर आपला राग काढला आहे. आपल्या चार मुलांसाठी लढत राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा : एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नी निकिता सिंघानिया, सासू आणि मेव्हण्याला अटक

'बाकीचा हिशोब खुदा करेल'- गुलाम हैदर

पाकिस्तानात राहणाऱ्या गुलाम हैदरने आपल्या चार मुलांना परत पाठवण्याची मागणी पुन्हा एकदा केली. माझी चारही मुले 10 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत, त्यांना त्यांच्या वडिलांकडे परत पाठवा. त्यांनी पीएम मोदी आणि सीएम योगींना आपल्या मुलांसाठी आवाहन केले. बाकीचा हिशोब खुदा पाहील असेही ते म्हणाले.

गुलाम हैदर म्हणाले की, सीमाबाबत मी म्हणू शकतो की अशा लोकांचा शेवट खूप वाईट होईल. तिने आपली लाज बाजूला ठेवली आहे. ती जे काही करत आहे, कोणतीही लाज असलेली स्त्री असे करू शकत नाही. गुलामने असेही सांगितले की तिला तिच्या असहाय वडिलांकडून नक्कीच शाप मिळेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+