कसे आहे दिल्लीतील RSSचे मुख्यालय..? 150 कोटींचा खर्च, 12 मजले, रुग्णालय, कॅन्टींन आणि वाचनालयही...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्लीत पाच लाख स्क्वेअर फुटांच्या जागेत स्वतःच मुख्यालय बांधलं आहे. केशव कुंज नावाच्या या मुख्यालयाच्या इमारतीत १२ मजले आहेत. या इमारतीचं काम नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ साली सुरु करण्यात आलं होतं. आता ते पूर्ण झाले आहे. या मुख्यालयासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च झाला असून त्यासाठी लोकवर्गणी व देणग्या स्विकारल्या गेल्या आहेत. काय आहे या मुख्यालयात, तेच आपण पाहू...

देणगीतून उभी राहिली वास्तू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे मुख्यालय देणगी निधीतून उभे राहिले आहे. ७५ हजार लोकांनी त्यासाठी देणग्या दिल्या. अनेकांनी प्रत्येकी ५ लाखांची देणगी दिली. अनुप दवे या गुजरातच्या इंजिनिअरने या मुख्यालयाचे डिझाईन केले आहे. केशव कुंज या इमारतीचा काही भाग गेल्यावर्षी पूर्ण झाला होता. तेव्हापासून काही विभागाचं शिप्टींग तेथे सुरु होतं. आता हे काम पूर्ण झालं आहे. संघाचे हे दिल्लीतील तिसरे मुख्यालय आहे. याआधी नागपूर आणि मध्य प्रदेशात संघाची भव्यदिव्य मुख्यालये आहेत.
काय आहेत वैशिष्ट्ये?
या मुख्यालयासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च करण्यात आला. केशवकुंज या मुख्यालयात साधना, प्रेरणा आणि अर्चना अशा प्रत्येकी १२ मजल्यांच्या तीन इमारती आहेत. तसेच एक मोठं वाचनालय आहे. पाच खाटांचं रुग्णालय आहे. एवढंच नाही तर लॉनही आहे. येथे हनुमान मंदिरही बांधण्यात आले आहे. १३०० लोक बसू शकण्याची क्षमता असलेली तीन ऑडिटोरियम आहेत. तसंच २७० कार पार्क होऊ शकतील, एवढं मोठं पार्किंगही आहे.
होणार सौर उर्जाचा वापर
संघ मुख्यालयात जे तीन टॉवर बसविण्यात आले आहेत, त्यावर सौर उर्जेसाठीचे पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यातून होणाऱ्या वीज निर्मितीचा वापर इमारतींमध्ये करण्यात आला आहे. या मुख्यालयात भल्या मोठ्या कँटीनची सुविधाही देण्यात आली आहे. या इमारतीतल्या १० व्या मजल्यावर केशव पुस्तकालय हे वाचनालय सुरु करण्यात आले आहे. रिसर्च करणाऱ्यांसाठी स्वतंत्र क्युबिकल्सही तयार करण्यात आली आहेत. या मुख्यालयात पाच खाटांचं छोटं रुग्णालयही उभारण्यात आलं आहे.












Click it and Unblock the Notifications