Republic Day 2026 :प्रजासत्ताक दिन बेस्ट मराठी WhatsApp स्टेटस, शुभेच्छा संदेश, खास तुमच्यासाठी
Republic Day 2026 Best Marathi WhatsApp status : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभर शिगेला पोहोचला आहे. दिल्लीच्या राजपथावर (कर्तव्यपथ) होणाऱ्या शानदार संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच, दुसरीकडे डिजिटल जगातही देशाभिमानाचे रंग जोरदारपणे उधळले जात आहेत. WhatsApp, फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रजासत्ताक दिनाचा ट्रेंड टॉपवर असून, नागरिक मोठ्या उत्साहाने आपले प्रोफाइल पिक्चर (DP) आणि स्टेटस बदलून या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होत आहेत.

या वर्षी, "डिजिटल इंडिया"ची संकल्पना खऱ्या अर्थाने साकार होताना दिसत आहे. तरुण पिढी केवळ शुभेच्छा संदेश पाठवण्यापुरती मर्यादित न राहता, भारतीय संविधान, तिरंग्याचा सन्मान आणि देशाच्या सामर्थ्याबद्दलचे विचार मांडणारे आकर्षक ग्राफिक्स आणि फोटो शेअर करत आहे. #RepublicDay2026, #ProudIndian, #JaiHind, #MeraBharatMahan यांसारखे हॅशटॅग वापरून लाखो पोस्ट्स शेअर केल्या जात आहेत.
WhatsApp आणि सोशल मीडियासाठी खास स्टेटस आणि संदेश
- "रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक... तरी सारे भारतीय आहेत एक... प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! जय हिंद!"
- "ज्याचा मुकुट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा... तो आहे आमचा भारत देश! सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
- "संविधानाने दिला आम्हा जगण्याचा हक्क, उंच राहो तिरंगा आमचा हीच आहे मनी आस... वंदे मातरम्!"
- "गर्व आहे भारतीय असल्याचा! ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!"
- "हा प्रजासत्ताक दिन भारताला आणखी प्रगतीच्या शिखरावर नेईल यात शंका नाही, भारत सर्वार्थाने जगात बलशाली होत आहे. सर्वात मोठी लोकशाही असलेला प्रजासत्ताक देश म्हणजे माझा भारत.. वंदे मातरम्!"
WhatsApp आणि Instagram साठी 10 खास स्टेटस
- विविधतेत एकता हीच भारताची शान, तिरंगाच आहे आपली ओळख आणि आपला अभिमान. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- संविधानाचा सन्मान, हाच खरा देशाचा मान. ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- ज्यांच्या त्यागाने हा देश उभा आहे, त्या प्रत्येक वीराला मानाचा मुजरा. जय हिंद!
- माझा देश, माझा अभिमान! भारतीय असल्याचा सार्थ अभिमान आहे. वंदे मातरम्!
- चला, एक नवा आणि सामर्थ्यशाली भारत घडवूया. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- उंच उंच फडकत राहो तिरंगा आपला, जगात सर्वश्रेष्ठ होवो भारत देश आपला.
- तीन रंगांची शान, प्रजासत्ताकाचा मान. जय हिंद, जय भारत!
- फक्त एक दिवस नाही, तर प्रत्येक दिवस देशाचा विचार करूया. प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- हृदयात देशप्रेम आणि ओठांवर 'भारत माता की जय'... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- चला देशासाठी जगूया आणि देशासाठी लढूया. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications