Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'हे आक्षेपार्ह नाहीतर काय आहे?' रणवीर इलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

Ranveer Allahbadia: समय रैनाच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये पालकांवर अश्लील कमेंट केल्याप्रकरणी रणवीर इलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं चांगलेच फटकारलं आहे. आज मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबर रणवीर अलाहबादिया यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह त्याच्या अटकेवर बंदी घातली आहे.

याशिवाय रणवीर इलाहाबादियाचा पासपोर्ट देखील जमा केला जाईल. तसेच त्याला सध्या शो करण्यास मनाई करण्यात आली आहे. इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया यांनी केलेल्या टिप्पण्यांवर सर्वोच्च न्यायालयाने आज नाराजी व्यक्त केली आहे.

Supreme Court

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने रणवीरच्या याचिकेवर सुनावणी झाली. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे पुत्र अभिनव चंद्रचूड रणवीर इलाहाबादिया यांच्या वतीने खटला लढवत आहेत. वकील अभिनव चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, रणवीर इलाहाबादिया यांच्या जीवाला धोका आहे. त्याच्याविरुद्ध जीवे मारण्याच्या धमक्या आहेत. यावर खंडपीठाने म्हटले, 'आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही. ही अश्लीलता नाही तर ते काय आहे?'

इलाहाबादियाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या 10 महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या ते आपण जाणून घेऊया.

1. जर अशी विधाने अश्लीलता नसतील तर ती काय आहेत? तुम्ही कोणती भाषा वापरत आहात? तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलण्याचे स्वातंत्र्य कसे मिळाले?

2. लोकप्रिय असण्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कोणत्याही गोष्टीवर भाष्य करू शकता! तुम्ही लोकांच्या पालकांचा अपमान करत आहात. असं वाटतंय की तुमच्या मनात काहीतरी घाण आहे.

3. तुम्ही निवडलेले शब्द तुमच्या पालकांना, बहिणींना लाजवेल. संपूर्ण समाजाला लाज वाटेल, अशी ही एक विकृत मानसिकता आहे. तू आणि तुझ्या लोकांनी विकृतपणा दाखवला आहेस!

4. जर तुम्ही अशी विधाने करून स्वस्त लोकप्रियता मिळवू शकता, तर इतर कोणीही तेच करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करू शकते. अशा व्यक्तीचे म्हणणे न्यायालयाने का ऐकावे?

5. हे निंदनीय वर्तन आहे, जिथे एखाद्याला वाटते की, तो काहीही करू शकतो आणि तो समाजाला हलक्यात घेत आहे? या जगात कोणाला हे आवडेल ते आम्हाला सांगा.

6. तुम्हाला कलाकृतीच्या नावाने परवाना मिळाला आहे का? तुमची भाषा अपमानास्पद आणि आक्षेपार्ह होती.

7. न्यायमूर्ती एम कोटेश्वर सिंह म्हणाले की, जर पोलिस तुम्हाला चौकशीसाठी बोलावत असतील तर ते आवश्यक ती सुरक्षा पुरवतील याची मला खात्री आहे.

8. जेव्हा जेव्हा रणवीरला चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा त्याला चौकशीत सामील व्हावे लागेल.

9. रणवीर इलाहाबादिया याला दिलेल्या धमकीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, त्यांनी (धमकी देणाऱ्याने) वापरलेली भाषा तुमच्या भाषेपेक्षा चांगली आहे.

10. तुम्हाला मिळत असलेल्या धमक्यांबाबत, कायदा आपले काम करेल. राज्य सरकार धमकी देणाऱ्यांवर कारवाई करेल. आपल्याकडे कायद्याच्या आधारावर चालणारी न्यायव्यवस्था आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+