Raksha Bandhan 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
Raksha Bandhan 2024 : देशभरात आज (19 ऑगस्ट) रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाच्या सणाला बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि आनंदासाठी शुभेच्छा देते. भाऊ आपल्या प्रिय बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनाच्या दिवसानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे "हा पवित्र सण तुमच्या नात्यात नवीन गोडवा घेऊन येवो आणि तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येवो."
समस्त देशवासियों को भाई-बहन के असीम स्नेह के प्रतीक पर्व रक्षाबंधन की ढेरों शुभकामनाएं। यह पावन पर्व आप सभी के रिश्तों में नई मिठास और जीवन में सुख, समृद्धि एवं सौभाग्य लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी X वर लिहिले, "रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. भाऊ-बहिणींमधील प्रेम आणि परस्पर विश्वासाच्या भावनेवर आधारित हा सण सर्व बहिणी आणि मुलींबद्दल आपुलकी आणि आदराची भावना निर्माण करतो. या सणाच्या दिवशी, मी सर्व देशवासीयांनी आपल्या समाजातील महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी संकल्प करावा."
रक्षा बंधन के पावन अवसर पर, मैं सभी देशवासियों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देती हूं। भाई-बहन के बीच प्रेम और आपसी विश्वास की भावना पर आधारित यह त्योहार, सभी बहन-बेटियों के प्रति स्नेह और सम्मान की भावना का संचार करता है। मैं चाहूंगी कि इस पर्व के दिन, सभी देशवासी, हमारे समाज…
— President of India (@rashtrapatibhvn) August 19, 2024
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या X वर लिहिले, 'रक्षाबंधन' या पवित्र सणाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. भाऊ-बहिणीमधील अतूट प्रेम आणि आपुलकीच्या या सणानिमित्त मी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतो. त्याचवेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांची बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे हा रक्षणाचा धागा सदैव आपल्या पवित्र नात्याला घट्ट ठेवो.
भाई-बहन के अटूट प्रेम एवं स्नेह के पर्व, रक्षाबंधन की सभी देशवासियों को बहुत-बहुत बधाई और शुभकामनाएं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 19, 2024
रक्षा का यह सूत्र आपके इस पावन रिश्ते को सदैव मजबूती के साथ जोड़े रहे। pic.twitter.com/Xvsqj2rt4e
रक्षाबंधनाचे महत्व
रक्षाबंधन हा एक पारंपारिक हिंदू सण आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या नात्याचे प्रतीक आहे. रक्षाबंधनाच्या सणाला बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि आनंदासाठी शुभेच्छा देते. भाऊ आपल्या प्रिय बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो हा विधी कुटुंबांमधील परस्पर आदर आणि काळजीचे प्रतीक आहे.












Click it and Unblock the Notifications