पीएम किसानचे 2 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? लाभार्थी यादीत नाव, स्टेटस 2 मिनिटांत करा चेक
PM Kisan Yojana 22nd Installment Status : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित २२ वा हप्ता नुकताच १३ मार्च रोजी जाहीर केला आहे. आसाममधील गुवाहाटी येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात ९.३२ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट १८,६४० कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. तुमच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तपासू शकता.

पीएम किसान योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:
- आर्थिक मदत: पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण ६,००० रुपये दिले जातात.
- हप्त्यांचे स्वरूप: ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात (DBT) जमा केली जाते.
- व्याप्ती: देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक पाठबळ देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- थेट लाभ: मध्यस्थांशिवाय पूर्ण पारदर्शकतेने ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते.
असे तपासा तुमचे नाव आणि पेमेंट स्टेटस
१. लाभार्थी यादीत नाव कसे पाहावे?
- अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या.
- उजव्या बाजूला 'Farmers Corner' मध्ये 'Beneficiary List' वर क्लिक करा.
- तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- 'Get Report' वर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावाची यादी दिसेल, त्यात तुमचे नाव तपासा.
२. खात्याचे स्टेटस (Status) कसे तपासावे?
- वेबसाईटवरील 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
- 'Get OTP' वर क्लिक करा. तुमच्या ई-केवायसी नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल.
- ओटीपी टाकून सबमिट केल्यावर तुम्हाला हप्त्याची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल.
पैसे मिळाले नसल्यास येथे करा तक्रार
जर २२ वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नसेल, तर तुम्ही खालील अधिकृत हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधू शकता.
- टोल-फ्री नंबर: १८००-११५-५२६
- हेल्पलाइन: १५५२६१ किंवा ०११-२३३८१०९२
- ई-मेल आयडी: [email protected]
पीएम किसान eKYC प्रक्रिया कशी करायची?
१. अधिकृत वेबसाईटला भेट द्या
सर्वात आधी मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
२. eKYC पर्यायाची निवड
मुख्य पृष्ठावर (Home Page) उजव्या बाजूला असलेल्या 'Farmers Corner' विभागात 'eKYC' या पर्यायावर क्लिक करा.
३. आधार नंबर टाका
पुढील पेजवर तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) टाकून 'Search' बटणावर क्लिक करा. त्यानंतर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि 'Get OTP' वर क्लिक करा.
४. OTP व्हेरिफिकेशन
तुमच्या मोबाईलवर आलेला OTP बॉक्समध्ये टाकून 'Submit' करा. प्रक्रिया यशस्वी झाल्यावर स्क्रीनवर "eKYC is Successfully Submitted" असा मेसेज येईल.
टीप: जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल, तर तुम्हाला जवळच्या CSC केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने eKYC करून घ्यावे लागेल.












Click it and Unblock the Notifications