Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Piyush pandey passes away अब की बार मोदी सरकारचा नारा देणाऱ्या 'या' अ‍ॅड गुरुचे निधन, मोदींकडून शोक

Piyush pandey ad guru passes away : भारतीय जाहिरात क्षेत्राचे भीष्माचार्य, पद्मश्री पीयूष पांडे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. 'अबकी बार, मोदी सरकार' या अजरामर राजकीय घोषणेसह फेविकोल, कॅडबरी, एशियन पेंट्स अशा अनेक ब्रँड्सना घराघरांत पोहोचवणारे हे 'ऍड-गुरु' शुक्रवार, २४ ऑक्टोबर, २०२५ रोजी अखेरचा श्वास घेऊन गेले. ते काही दिवसांपासून संसर्गाने त्रस्त होते.

piyush pandey ad guru passes away

जाहिरात क्षेत्राचा तारा तुटला!

पीयूष पांडे यांनी तब्बल चार दशके भारतीय जाहिरात क्षेत्रावर आपली अमीट छाप सोडली. ओगिल्वीचे वर्ल्डवाइड चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर आणि इंडियाचे एग्जीक्यूटिव्ह चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८२ मध्ये ओगिल्वीशी जोडले गेलेले पांडे हे 'क्रिएटिव्हिटी आणि कल्चरल स्टोरीटेलिंग' यांचा संगम साधण्यासाठी ओळखले जात. त्यांनी साध्या-सोप्या भाषेचा वापर करून जाहिरातींना भारतीय जनमानसाच्या हृदयाशी जोडले.

स्मृतिशेष जाहिरात अभियान

पांडे यांची निर्मिती क्षमता केवळ ब्रँड्सपुरती मर्यादित नव्हती; ती सांस्कृतिक कथा बनून गेली. त्यांच्या काही अविस्मरणीय स्लोगन्स आणि कॅम्पेन्स.

  • 'अबकी बार, मोदी सरकार' (२०१४ निवडणुकीसाठी)
  • फेविकोल ॲड कॅम्पेन (बस, मासे, सोफा)
  • कॅडबरी - 'कुछ खास है'
  • एशियन पेंट्स - 'हर खुशी में रंग लाए' आणि 'हर घर कुछ कहता है'
  • वोडाफोन (पग, जूजूज ॲड)
  • पोलिओ जाहिरात अभियान (अमिताभ बच्चन यांच्यासोबत)

सन्मान आणि वारसा

भारतीय जाहिरात क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली ओगिल्वी इंडियाने अनेक पुरस्कार जिंकले. २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पियूष पांडे यांच्या निधनामुळे भारतीय जाहिरात विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली अशी भावना जाहीरात क्षेत्रातून आल्या आहेत.

उद्या २४ ऑक्टोबर रोजी शनीवारी पियूष पांडे यांच्यावर अंत्यसंस्कार मुंबईतील शिवाजी पार्क येथे केला जाईल. पीयूष पांडे यांनी त्यांच्या 'कथा-कौशल्या'तून जाहिरातींना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आणि त्यांचे हे कार्य जाहिरात क्षेत्रातील भावी पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील.

पीएम मोदींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पियुष पांडे यांच्या निधनाबद्ल शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पियूष पांडे यांच्या सर्जनशीलतेसाठी प्रशंसनीय होते. त्यांनी जाहिरात आणि संवाद माध्यमाच्या जगात एक अविस्मरणीय योगदान दिले आहे. गेल्या काही वर्षांत आमच्यातील झालेला संवाद मी मनापासून जपून ठेवेन. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबा आणि चाहत्यांसोबत माझे संवेदना आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+