नवीन पॅन कार्ड बनवणे खूप सोपे! ॲडव्हान्स PAN CARD बाबत 'या' 10 गोष्टी जाणून घ्या, मग टेन्शनच नाही!
Pan card upgraded new features : केंद्र सरकारने 25 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठकीत पॅनकार्डबद्दल नवीन धोरण जाहीर केले आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅन 2.0 प्रोजेक्टला मंजुरी दिली. त्यामुळे तुमचे पॅनकार्ड आता बदलणार आहे. हे पॅनकार्ड कसे असेल ते अपडेट करावे लागेल का? क्युआर कोडचा उपयोग काय अशी अनेक प्रश्न अनेकांना पडली आहेत.
वाचकांनो आपण आज येणाऱ्या नव्या पॅनकार्डशी संबंधित महत्त्वाची माहिती दहा मुद्द्यांत जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुमचा सर्व गोंधळ दूर होईल.

1. पॅन कार्ड अपग्रेड करण्यामागचे मुख्य कारण केंद्र सरकारचे धोरण आहे. पॅन अपग्रेडसाठी PAN 2.0 लाँच केले जाईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, पॅन 2.0 प्रकल्प हा एक ई-गव्हर्नन्स उपक्रम आहे. पॅन प्रमाणीकरण सुलभ आणि सुरक्षित करणे हे यामीगल उद्देश आहे.
2. नवीन पॅन कार्ड बनवणे देखील खूप सोपे आहे. तुम्ही ते प्रिंटेड आणि डिजिटल दोन्ही प्रकारे बनवू शकता.
3. तुमचे जुने पॅनकार्डचे पुढे काय होईल ते उपयोगात येईल की, नाही हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर त्याबद्दल सांगायचे झाल्यास, ज्यांच्याकडे जुने पॅनकार्ड आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. नवीन आल्यानंतरही जुन्या पॅन कार्डची वैधता संपणार नाही. ते पूर्वीप्रमाणेच वैध राहील.
4. प्रत्येक व्यक्तीकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे जुने पॅनकार्ड असेल तर त्याचा क्रमांक तोच राहील. पण तुम्हाला हे पॅन कार्ड अपडेट करावे लागेल.
5. जर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की पॅन कार्डमधील डेटा सुरक्षित असेल की नाही? त्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, अपग्रेड केलेल्या पॅनमधील डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल. यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट प्रणाली बनवली जात आहे.
6. चांगल्या डिजिटल अनुभवासाठी PAN/TAN सेवांचे तंत्रज्ञान-आधारित परिवर्तन निश्चित करेल. यासाठी सरकारने या प्रकल्पावर 1 हजार 435 कोटी रुपये खर्च करण्याचे सांगितले आहे.
7. पॅन आणि आधार लिंक करणे आधीच अनिवार्य आहे. इतर आर्थिक माहितीही पॅन 2.0 द्वारे एकत्रित केली जाईल, यामुळे कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल.
8. याशिवाय जुन्या पॅन कार्डचा डेटा नवीन डिजिटल मानकांशी जोडला जाईल. यामुळे व्यवहार आणि कर भरण्यास गती मिळेल.
9. पॅन कार्ड भविष्यात सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी एकच ओळखपत्र म्हणून काम करेल आणि यामुळे डेटा सुरक्षितता देखील वाढेल.
10. तुम्हाला हे पॅन कार्ड मोफत मिळू शकते. क्यूआर कोडसह पॅनसाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही.












Click it and Unblock the Notifications