Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सीमा हैदर म्हणतेय, 'मी आधी पाकिस्तानची मुलगी होती, पण आता मी भारताची सून आहे, मला भारतात राहू द्या'

Seema Haider News : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त केला जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भीतीच्या छायेत असलेल्या सीमा हैदरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सीमा हैदर म्हणाली की, "मी गाडीतून उडी मारून मरेल, पण पाकिस्तानला परत जाणार नाही. मी पाकिस्तानची मुलगी होती, पण आता मी भारताची सून आहे." तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे भारतात राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. 2023 मध्ये नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या सीमाने उत्तर प्रदेश येथील सचिन मीणा यांच्यासोबत लग्न केले आहे. तिचा प्रतिक्रियाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

seema haider

सीमा हैदर ही पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची येथील रहिवासी आहे. ती 2023 मध्ये आपल्या चार मुलांसह नेपालमार्गे अवैधरित्या भारतात आली होती. तिची ओळख ऑनलाइन गेम पबजीद्वारे सचिन मीणा यांच्याशी झाली, ज्यांच्यासोबत तिने नंतर लग्न केले. जुलै 2023 मध्ये गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील रबूपुरा परिसरात तिला भारतीय अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला आणि सचिनला तात्पुरती जामीनावर सोडण्यात आलं. सध्या ती सध्या ग्रेटर नोएडामध्ये राहत आहेत. मार्च 2025 मध्ये सीमाने मुलीला जन्म दिला आहे.

सीमाने भारतात स्थायिक होण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला असल्याचा दावा केला आहे. ती स्वतःला "भारताची सून" म्हणून सांगते. एका रिपोर्टनुसार तिची नागरिकता आता तिच्या भारतीय पतीशी जोडली गेली आहे, त्यामुळे तिला परत पाठवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय लागू होऊ नये, असे तिचे वकील ए.पी. सिंग यांनी सांगितले आहे. दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर वाढलेल्या तणावामुळे तिच्या परत पाठवण्याची शक्यता चर्चेत आली आहे.

केंद्र सरकारने 26 एप्रिल 2025 पासून सर्व पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवांवर बंदी घातली असून 27 एप्रिलपासून सर्व वैध व्हिसे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय व्हिसे फक्त 29 एप्रिलपर्यंत वैध राहतील आणि सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या व्हिसा कालावधीपूर्वी देश सोडावा लागणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+