Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Lawrence Bishnoi: "जो लाखात एक असेल त्याला मारु!" पहलगाम हल्ल्यानंतर बिष्णोई गँगची पाकिस्तानला धमकी!

Pahalgam terror attack Lawrence Bishnoi Gang threatens Pakistan : "पाकिस्तानात नरसंहार होईल, जो लाखात एक असेल त्याला मारु. तुम्ही जर हात मिळवला तर पुढे येऊ आणि डोळे वटारले तर डोळे काढून घेऊ" असे म्हणत लाॅरेन्स बिष्णोई गँगने पाकिस्तानला धमकी दिली आहे.

लाॅरेन्स बिष्णोई गँगच्या या पोस्टची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे तशीच ती पाकिस्तानमध्येही होत आहे. रिपोर्टनुसार, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी या गँगने पाकिस्तानला दिल्याची माहिती समोर आली आहे.

Lawrence Bishnoi Gang threatens Pakistan

काय आहे व्हायरल पोस्ट?

"दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा कोणताही दोष नसताना मृत्यू झाला, आम्ही लवकरच त्याचा बदला घेऊ. या लोकांनी आमच्या बेकायदेशीर पुरुषांना मारले आहे, आम्ही त्यांच्या न्यायासाठी मरणार आहोत. असाच एक माणूस मरेल, पाकिस्तानात एक नरसंहार होईल ज्याची किंमत १ लाख असेल. जर तु"म्ही आमच्याशी हस्तांदोलन केले तर आम्ही पुढे येऊ, जर तुम्ही आमचे डोळे दाखवले तर आम्ही आमचे डोळे काढू आणि जर तुम्ही असे नीच कृत्य केले तर आम्ही तुम्हाला पाकिस्तानात दगड खाऊन योग्य उत्तर देऊ. लॉरेन्स बिश्नोई ग्रुप... जितेंद्र गोगी ग्रुप. हाशिम बाबा..काळा राणा.
गोल्डीब्रार.रोहितगोदरा."

"..जय भारत जय भारत"

Lawrence Bishnoi Gang threatens Pakistan

बिष्णोई गँगच्या रडारवर सईद हाफिस तर नाही?

बिष्णोई गँगने लाखात एक असलेल्याला मारु असे म्हटले आहे, याशिवाय एक पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात भारताचा दुष्मन असलेला दहशदवादी हाफीज सईद याचा फोटा आणि त्यावर फुली दिसत आहे. हा फोटो अनेक माध्यमांनी आपल्या वृत्तात प्रकाशित केला आहे. त्यामुळे आता चर्चा आहे की, बिष्णोई गँगच्या रडारवर जो लाखात एक आहे तो हाफिस सईद तर नाही ना...?

कोण आहे हाफिज सईद?

हाफिज सईद हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. सईद हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. हा दहशतवादी मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड देखील आहे. याशिवाय, हाफिज भारतावरील बहुतेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी आहे. भारताव्यतिरिक्त, जगातील अनेक देशांनी हाफिजला दहशतवादी घोषित केले आहे.

बिष्णोई गँगबद्दल ...

लाॅरेन्स बिष्णोई गँगचे नेटवर्क देशातील बारा राज्यात आहेत. या गँगमध्ये जवळपास सातशे शुटर्स आहेत. या गँगच्या निशाण्यावर कुणी सामान्य नाही तर थेट सेलिब्रेटी असतात. चिंकारा काळवीट प्रकरणात सलमान खानला सतत धमकी दिली जाते ही धमकी बिष्णोई गँगकडून येतात असे म्हटले जाते, महाराष्ट्रातील माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात या गँगचा समावेश होता असाही आरोप केला जातो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+