Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

INS Vikrant: समुद्रात सोडण्यात आलेले पहिले स्वदेशी एअरक्राफ्ट, किती शक्तीशाली अन् खास, जाणून घ्या

INS Vikrant price budget how powerful know complete details in Marathi : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन या भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतप्त लाट पसरली आहे. 26 पर्यटक अन् 2 स्थानिक असे मिळून 28 जणांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर आता भारतातील नागरिकांकडून दहशतवाद्यांचा बिमोड करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, भारताने गुरुवारी मोठी कारवाई करत आपली युद्धनौका आयएनएस विक्रांत समुद्रात उतरवली आहे. फ्रान्समध्ये बनवलेले राफेल विमान लवकरच या ताफ्यात तैनात केले जाणार आहे.

अशातच, भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सातत्याने संघर्षमय होऊ लागली आहे. दरम्यान, भारताचा हा निर्णय एक मोठे पाऊल मानले जात आहे. भारताने आयएनएस विक्रांत ही युद्धनौका पाण्यात उतरवली आहे, ती किती शक्तीशाली आहे आणि त्याचे वैशिष्ट्ये काय आहे, यावर आपण नजर टाकूया...!

Pahalgam Terror Attack

विक्रांतवर सद्या मिग-29 विमाने तैनात

सध्या विक्रांतवर मिग-29 विमाने तैनात आहेत. या ताफ्यात अत्याधुनिक राफेल लढाऊ विमाने तैनात करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. येणाऱ्या काळात भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढू शकतो. बुधवारी झालेल्या सीसीएस बैठकीत भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठे निर्णय घेतले आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत गप्प बसणार नाही, मोठी कारवाई निश्चित आहे, असे मानले जाते.

40 लढाऊ विमाने वाहून नेण्याची क्षमता

आयएनएस विक्रांत या एअरक्राफ्टवर सुमारे 40 लढाऊ विमाने पार्क करता येतात. त्याचे टर्बाइन विद्युत आहेत. सध्या या युद्धनौकेवर 10 कमाओव का-31 हेलिकॉप्टर आणि मिग 29 लढाऊ विमानांचे 2 स्क्वॉड्रन तैनात आहेत. या जहाजाची मारक शक्ती 1500 किमी आहे आणि ते 64 बराक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. ही क्षेपणास्त्रे हवेत मारा करण्यास सक्षम आहेत. हे जहाज जगातील टॉप-10 विमानवाहू युद्धनौकांमध्ये समाविष्ट आहे.

पाकचा लष्करी सराव अन् भारत सतर्क

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची नुकतीच भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने इतर देशांतील राजदूतांनाही बोलावून सविस्तर माहिती दिलेली आहे. सद्या पाकिस्तान अरबी समुद्रात गोळीबार सराव करत आहे. हा सराव 25 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहील. अशा परिस्थितीत INS विक्रांतचे प्रक्षेपण हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. विक्रांत हे स्वदेशी बनावटीचे असून त्याची लांबी 262 मीटर आणि रुंदी 59 मीटर आहे.

आयएनएस विक्रांतची निर्मिती कशी केली गेली?

भारतात बनवलेल्या आयएनएस विक्रांतमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू स्वदेशी नाहीत. याचा अर्थ काही सुटे भाग परदेशातूनही आयात करण्यात आले आहेत. तथापि, नौदलाच्या मते, संपूर्ण प्रकल्पातील 76 टक्के काम देशात उपलब्ध असलेल्या संसाधनांमधून करण्यात आले.

SAIL कडून खरेदी करण्यात आले स्टील!

विक्रांतच्या बांधकामासाठी आवश्यक असलेले युद्धनौका दर्जाचे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) कडून खरेदी करण्यात आले. हे पोलाद तयार करण्यासाठी भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेची (DRDL) मदतही घेण्यात आली. SAIL कडे आता युद्धनौका पातळीचे स्टील तयार करण्याची क्षमता असल्याने भविष्यात देशाला खूप मदत होईल.

किती स्टील अन् केबल लागले विक्रांतसाठी?

नौदलाच्या म्हणण्यानुसार, या युद्धनौकेच्या स्वदेशी घटकांमध्ये 23,000 टन स्टील, 2.5,000 टन स्टील, 2,500 किलोमीटर इलेक्ट्रिक केबल्स, 150 किलोमीटर पाईप्स आणि 2000 व्हॉल्व्ह यांचा समावेश आहे. याशिवाय, विमानवाहू जहाजात समाविष्ट असलेल्या हल बोटी, एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन प्लांट आणि स्टीअरिंगशी संबंधित भाग हे सर्व देशातच तयार केले जातात.

विक्रांतची खासियत काय आहे?

  • कोचीन शिपयार्डमध्ये बांधलेले आयएनएस विक्रांत 262 मीटर लांब आहे. त्याच वेळी, त्याची रुंदी देखील सुमारे 62 मीटर आहे. ते 59 मीटर उंच आहे आणि त्याचा बीम 62 मीटर आहे.
  • या युद्धनौकेमध्ये 14 डेक आणि 2,300 कप्पे आहेत. जे 1,700 हून अधिक कर्मचाऱ्यांना सामावून घेऊ शकतात.
  • यामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन बनवण्यात आल्या आहेत. याशिवाय, त्यात आयसीयू आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांपासून सर्व वैद्यकीय सेवा देखील आहेत.
  • आयएनएस विक्रांतचे वजन सुमारे 40 हजार टन आहे, जे इतर जहाजांपेक्षा सर्वाधिक मानले जात आहे.
  • आयएनएस विक्रांतची खरी ताकद समुद्रात दिसून येते. जिथे त्याचा कमाल वेग ताशी सुमारे 51 किमी. त्याचा सामान्य वेग 18 नॉट्स पर्यंत म्हणजेच 33 किमी प्रति तास आहे.
  • हे विमानवाहू जहाज एकाच वेळी 7,500 नॉटिकल मैल म्हणजेच 13,000+ किलोमीटर अंतर कापू शकते.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+