पहलगाम हल्ला अन् सैन्यात बदल; हवाई दलाचे नवे उपप्रमुख नर्मदेश्वर तिवारी कोण आहेत?, बॉर्डरची जबाबदारी
IAF New Vice Chief Narmdeshwar Tiwari : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्लानंतर भारत सरकारच्या वतीने मोठे निर्णय घेण्यात आले. सिंधु पाणी कराराला स्थगिती दिली. त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांना भारतातून परतण्याचे आदेश देण्यात आले. तर पाकिस्तानी नागरिकांना आता व्हिसा बंद करण्यात आला. एकीकडे शासनाच्या वतीने हे मोठे निर्णय घेण्यात आले. तर दुसरीकडे, भारतीय हवाई दलात देखील मोठे फेरबदल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांना हवाई दलाचे नवे उपप्रमुख बनवण्यात आले आहे. एअर मार्शल तिवारी एअर मार्शल एसपी धारकर यांच्या जागी नियुक्त करण्यात आले. एअर मार्शल धारकर 40 वर्षांहून अधिक काळ सेवा केल्यानंतर ते निवृत्त होत आहेत. एअर मार्शल तिवारी यांच्या नियुक्ती आदेशात ते 30 एप्रिल रोजी पदभार स्वीकारणार आहेत.

कोण आहेत नर्मदेश्वर तिवारी?
एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी हे हवाई दलाचे एक वरिष्ठ अधिकारी आहेत. एअर मार्शल तिवारी हे सध्या दक्षिण पश्चिम हवाई कमांडचे कमांडर आहेत. त्यांचे गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी मुख्यालय आहे. 1 मे 2023 रोजी त्यांनी साउथ वेस्टर्न एअर कमांड (SWAC) चे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांनी एअर मार्शल विक्रम सिंग यांची जागा घेतली होती. तिवारी हे ऑक्टोबर 2021 ते 30 एप्रिल 2023 पर्यंत हवाई दलाचे उपप्रमुख होते.
नर्मदेश्वर तिवारी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी?
एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांच्या शैक्षणिक पाश्वभूमीबद्दल बोलायचे झाले तर ते पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA[) मधून पदवीधर आहेत. दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे अध्यक्ष सुवर्णपदक विजेते आहेत. 7 जून 1986 रोजी ते हवाई दलात सामील झाले. त्यांना लढाऊ दलात नियुक्त करण्यात आले. त्यांची कारकीर्द 37 वर्षांची आहे.
एअर मार्शल तिवारी यांना लढाऊ विमाने उडवण्याचा 3600 तासांचा अनुभव आहे. ते एक पात्र उड्डाण प्रशिक्षक आणि प्रायोगिक चाचणी पायलट देखील म्हणून ओळखले जातात. त्यांनी मिराज-2000 हे विमान देखील उडवले आहे. कारगिल युद्धात त्यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले. त्यांनी भारतीय हवाई दलाचे 'तेजस' हे लढाऊ विमान उडवण्याचे प्रशिक्षणही घेतलेले आहे.
नर्मदेश्वर तिवारी यांचा कोणता पुरस्कार मिळाला?
एअर मार्शल तिवारी यांना 2008 मध्ये 'वायू सेना पदक' प्रदान करण्यात आले. 2022 मध्ये 'अति विशिष्ट सेवा पदक' मिळाले. 2025 मध्ये त्यांना 'परम विशिष्ट सेवा पदक' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे नॉर्दर्न आर्मी कमांडर
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, पहलगाम हल्ल्यानंतर लष्करातील अन्य महत्त्वाच्या पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे नॉर्दर्न आर्मी कमांडर बनले आहेत. ते लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांची जागा घेतील.
भारतीय लष्कराच्या उत्तरी सैन्याकडे जम्मू आणि काश्मीरच्या पश्चिमेकडील नियंत्रण रेषा (LoC) आणि पूर्वेकडील लडाखला लागून असलेल्या चीन सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
आशुतोष दीक्षित 1 मे पासून सीआयएससी प्रमुखपदी
याशिवाय, तिन्ही दलांच्या समन्वयासाठी स्थापन केलेल्या एकात्मिक संरक्षण कर्मचारी (IDS) मध्ये एक नवीन चीफ ऑफ स्टाफ कमिटी (CISC) देखील नियुक्त केली जाईल.
एअर मार्शल आशुतोष दीक्षित 1 मे पासून सीआयएससी म्हणून पदभार स्वीकारतील. ते 30 एप्रिल रोजी निवृत्त होणाऱ्या लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू यांची जागा घेतील.
लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा कोण आहेत?
- 1 नोव्हेंबर 2024 पासून उप-सेनाप्रमुख (रणनीती) म्हणून पदभार स्वीकारला. 19 डिसेंबर 1987 रोजी मद्रास रेजिमेंटच्या बटालियनमध्ये नियुक्त झाले होते.
- मेजर जनरल असताना, त्यांना 25 व्या इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
- जम्मू आणि काश्मीरमध्ये 80 व्या इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केले. त्यांनी लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) म्हणूनही काम केले आहे.












Click it and Unblock the Notifications