NCERT मुघलांचे विषय वगळले! 7वी च्या अभ्यासक्रमात महाकुंभ, चारधाम, मेक इन इंडियाचा समावेश
NCERT drops Mughal topics changes syllabus of 7th : NCERT ची एक मोठी बातमी समोर आली आहे, एनसीआरटीने इयत्ता 7 वी च्या पुस्तकांचा अभ्यासक्रम बदलला आहे. यामध्ये इतिहास आणि भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघलांशी संबंधित विषय काढून टाकले आहेत. विशेष म्हणजे महाकुंभासह मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ, चारधाम आदी विषय पुस्तकांमध्ये जोडले गेले आहेत.

एनसीआरटीईकडून माहिती देण्यात आली की,ही पुस्तके 2 भागांमध्ये प्रकाशित केली जातील आणि हा फक्त पुस्तकांचा पहिला भाग आहे. तर दुसऱ्या भागात हे विषय जोडले जातील की नाही हे मात्र, स्पष्ट करण्यात आलेले नाही. हे बदल शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क म्हणजेच NCFSE 2023 द्वारे करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत
प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 देशात राबवले जात आहे. या अंतर्गत हा बदल करण्यात आल्याचे आता बोलले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे यापूर्वीही मुघल आणि दिल्लीतील ऐतिहासिक सत्ता यासंदर्भातील विषय कमी करण्यात आलेले आहेत. त्यात मोहम्मद तुघलक, अल्लाऊद्दीन खिलजी, इब्राहिम लोधी आणि मुघल यांच्या कर्तृत्वाशी संबंधित विषय होते.
तीन पुस्तकांचे एकत्रीकरण
NCERT ने इतिहास, भूगोल आणि सामाजिक आणि राजकीय 3 वेगवेगळी पुस्तके एकत्र करुन त्याचे एकच पुस्तक होईल असे व्यवस्थापन केले आहे. आता या पुस्तकाचे नाव एक्सप्लोरिंग सोसायटी- इंडिया आणि बियॉन्ड भाग 1. त्याचा भाग 2 लवकरच प्रकाशित होईल. ही पुस्तके 2025-26 या सत्रापासून लागू होणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात हिंदीला प्राधान्य, राज्यांचा विरोध
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गंत हिंदी विषयावर भर दिला जात आहे. त्यातच हिंदीवरुन वादळ उठले आहे, एकीकडे महाराष्ट्रात आधी हिंदी विषय सक्तीचा केला होता. यावर राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर मोठी टीका झाली आणि भाषावाद उफाळला. यानंतर हिंदीच्या आग्रहाबद्दल राज्य सरकारने एक पाऊल मागे घेत नरमाईचे धोरण राबवले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदीला पर्यायी विषय दिले आहेत.
हेही वाचा : मोठी बातमी : आता CBSC 10 वी परिक्षेचा निकाल SMS वरही मिळणार? जाणून घ्या निकाल कसा तपासायचा?
हेही वाचा: दहावी-बारावीच्या विद्यार्थांच्या निकालाबद्दल मोठी अपडेट समोर, निकाल कसा तपासायचा घ्या जाणून
हेही वाचा: CBSE Board Result 2025 : डिजीलॉकरवर दहावी, बारावीचा निकाल कसा तपासणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया












Click it and Unblock the Notifications