Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दहावी-बारावीच्या विद्यार्थांच्या निकालाबद्दल मोठी अपडेट समोर, निकाल कसा तपासायचा घ्या जाणून

SSC and HSC Result 2025 : महाराष्ट्रातील दहावी-बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या या परीक्षांमध्ये सुमारे 21 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बोर्डाने निकालाच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नसली तरी निकाल 15 मे 2025 पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये आयोजित केल्या होत्या. बारावी (HSC) ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2025 या कालावधीत झाली तर दहावी (SSC) ची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2025 या कालावधीत पार पडली. या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या असून विद्यार्थ्यांना कठोर नियमांचे पालन करावे लागले.

Maharashtra ssc and hsc result

या वर्षी, बोर्डाने निकाल लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळेल. बारावीचा निकाल 9 मे 2025 च्या आसपास तर दहावीचा निकाल 15 मे 2025 च्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. तथापि, बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, आणि विद्यार्थ्यांना सल्ला देण्यात आला आहे की, ते अधिकृत वेबसाइट्सवर नियमित अपडेट्स तपासत राहावेत.

निकाल जाहीर करण्यापूर्वी बोर्डाकडून एका पत्रकार परिषदेचे आयोजन केलं जाऊ शकतं. ज्यामध्ये निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल. मागील वर्षांप्रमाणे निकालाची घोषणा दुपारी 1 किंवा 2 वाजता होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाइट्स mahresult.nic.in, mahahsscboard.in, आणि hscresult.mkcl.org वरून आपला निकाल डाउनलोड करू शकतील. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल.

निकाल कसा तपासायचा?

महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पारदर्शक ठेवण्यात आली आहे. विद्यार्थी खालील स्टेप फॉलो करून आपला निकाल तपासू शकतील.

- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: 10 वीच्या विद्यार्थांना जर निकाल पाहायचा असेल तर त्यांनी mahahsscboard.in आणि 12 वीच्या विद्यार्थांसाठी hscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर जावे लागेल.

- निकालाची लिंक निवडा: होमपेजवर "SSC Result 2025" किंवा "HSC Result 2025" या लिंकवर क्लिक करा.

- आवश्यक माहिती भरा: रोल नंबर आणि इतर आवश्यक तपशील (जसे की आईचे नाव) प्रविष्ट करा.

- निकाल तपासा: "सबमिट" बटणावर क्लिक केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.

- डाउनलोड आणि प्रिंट: निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+