Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Navratri Ashtami 2025 : अष्टमी कधी आहे, होम-हवन कधी करायचा? जाणून घ्या दिवस, पूजेसाठी सामग्रीची यादी

Navratri Ashtami 2025 Home Hawan Date Time : शारदीय नवरात्रीचा काळ सध्या सुरू आहे. या नऊ रात्रींमध्ये महाष्टमीला विशेष महत्त्व आहे. यावर्षी तृतीया तिथीचा दोन दिवसांचा योग आल्याने नवरात्री दहा दिवसांची आहे. त्यामुळे दुर्गाष्टमीचा पवित्र सण ३० सप्टेंबर २०२५ रोजी साजरा केला जाईल. या दिवशी दुर्गामातेच्या स्वरूपाची आराधना केली जाते आणि भक्तगण विशेष पूजा, कन्या पूजन आणि हवनाचे आयोजन करतात.

कधी करु शकतात कन्या पुजन

ज्या भाविकांना नवमी तिथीला कन्या पूजन आणि हवन करायचे आहे, ते १ ऑक्टोबर रोजी येणाऱ्या महानवमीला हे अनुष्ठान करू शकतात. हवन आणि आरतीनंतर कन्या पूजन केले जाते. कन्यांना माता दुर्गेचे स्वरूप मानले जाते. त्यांचे पूजन करून त्यांना भोजन आणि भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. यानंतरच व्रताचे पारण केले जाते.

Navratri Ashtami 2025


अष्टमीला हवन कसे कराल? (Maha Ashtami Hawan Vidhi)
  • हवन सुरू करण्यापूर्वी, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे. हवनकुंड किंवा वेदी स्वच्छ करून पूजा सामग्री व्यवस्थित सजवून ठेवा.
  • पूजेची सुरुवात देवी मातासमोर संकल्प घेऊन करा.
  • संकल्पासाठी हातामध्ये जल, फूल आणि अक्षत (तांदूळ) घेऊन माता दुर्गेचा आशीर्वाद मागा.

हवन करताना लक्षात ठेवा..

हवन करताना दुर्गा सप्तशतीचे मंत्र किंवा नवार्ण मंत्र 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' चा उच्चार करून आहुती दिली जाते. आहुतीसाठी जौ (जव), तीळ, तांदूळ, तूप (घी), गूळ, साखर आणि गुग्गुळ यांचा वापर करणे शुभ मानले जाते. परंपरेनुसार, किमान १०८ आहुती देणे सर्वात उत्तम असते.

हवन सामग्रीची संपूर्ण यादी (Hawan Samagri List)

  • अष्टमीच्या पवित्र हवनासाठी आवश्यक असणारी सामग्री खालीलप्रमाणे आहे:
  • हवन कुंड / वेदी
  • आम्रपल्लव (आंब्याचे पाने) आणि आंब्याची किंवा सुकी लाकडे
  • कपूर (कापूर)
  • घी (तूप) आणि रुईची वात
  • रोळी, हळद, चंदन
  • तांदूळ (अक्षत), जवस (जव), तीळ
  • गूळ, साखर /मोहरी
  • गोंद, गुग्गुळ
  • सुपारी, लवंग, वेलची
  • नारळ (अखंड) आणि सुक्या नारळाचे तुकडे
  • कमलगट्टा (कमळाचे बी)
  • पंचमेवा (काजू, बदाम, मनुका, खजूर/छुहारा, अक्रोड)
  • पुष्प (लाल व पिवळी फुले)
  • आट्यापासून बनवलेल्या लहान गोळ्या (लाडवासारख्या)
  • दुर्वा (उपलब्ध असल्यास)
  • जल भरलेला कलश
  • कलावा (लाल-पिवळा दोरा)
  • रुमाल / वस्त्र (देवीला अर्पण करण्यासाठी)

पूर्णाहुती आणि कन्या पूजनाचे महत्त्व

हवनाच्या समाप्तीला पूर्णाहुती दिली जाते. यासाठी एका नारळावर कलावा बांधून त्यात सुपारी, नाणे आणि इतर सामग्री ठेवली जाते. त्यानंतर ते तुपात बुडवून मंत्रांसह अग्नीला समर्पित केले जाते. पूर्णाहुतीनंतर माँ दुर्गेची आरती करावी आणि पूजेत झालेल्या चुकांसाठी क्षमा मागावी.

हवन पूजेचे मुख्य मंत्र

हवनादरम्यान विविध देवी-देवतांचे आवाहन करून आहुती दिली जाते. त्यापैकी काही मुख्य मंत्र:

ओम गणेशाय नम: स्वाहा

ओम गौरियाय नम: स्वाहा

ओम नवग्रहाय नम: स्वाहा

ओम दुर्गाय नम: स्वाहा

नवार्ण मंत्र: 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे'

देवीचा मुख्य मंत्र: ओम जयंती मंगलाकाली, भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमस्तुति स्वाहा।

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+