Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Navratri 2024 : दसरा कधी आहे तारीख, वेळ, महत्त्व अन् देशात कुठे कसा होते विजयादशमी साजरी.. वाचा

Navratri 2024 Dussehra Date : दसऱ्याला नाही आनंदाचा तोटा सोने लुटा असं म्हटलं जातं सोने लुटा याचा अर्थ आनंद माना, आनंदात सहभागी व्हा असाही होता. दसरा हा एक प्रमुख हिंदू सण जो दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी दिवशी अर्थात दहाव्या दिवशी साजरा केला जातो. म्हणूनच त्याला दसरा म्हणतात. यंदा हा सण कधी आहे, वेळ तारीख आणि याचे महत्व अशा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. याला 'दसरा', 'दशहरा' किंवा 'दशैन' या नावानेही ओळखले जाते. हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो, जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत येतो.

Navratri 2024 Dussehra Date

(फोटो क्रेडिट - विकिपीडिया)

भारताच्या विविध भागांमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. भारतात दसरा हा सण खूपच महत्वपूर्ण मानला जातो. प्रभु श्रीरामाने याच दिवशी रावणाचा वध केला अशी आख्यायिका आहे. तर पांडव आपला वनवास संपवून याच दिवशी वनातून परत आले होते असेही सांगितले जाते. हा एक महान आणि सांस्कृतिक विचार मांडणारा सण आहे.

दसरा 2024 तारीख आणि वेळ

नऊ दिवस चालली नवरात्रोत्सवाची समाप्ती दसऱ्याने केली आहे. हिंदू कॅलेंडरमध्ये, तो अश्विन किंवा कार्तिक दिनाच्या 10 व्या दिवशी साजरा केला जातो. 12 ऑक्टोबर रोजी दसरा सण आहे

उत्तर भारत

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.

गुजरात

सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.

छत्तीसगड

छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात.

घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

पंजाब

पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. लोक परस्परांना मिठाई भेट देतात.

दक्षिण भारत

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.

आंध्रप्रदेश

आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याजोडीने दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हणले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही होते.
(स्त्रोत- विकिपीडिया)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+