National Unity Day wishes : ‘लोहपुरुष' सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त खास शुभेच्छा संदेश शेअर करा
National Unity Day 2025 wishes in marathi 25+ Inspiring Quotes : दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस स्वतंत्र भारताचे 'लोहपुरुष' सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला समर्पित आहे. सरदार पटेलांनी आपल्या दूरदृष्टी, धैर्य आणि दृढ निश्चयाने ५६५ हून अधिक संस्थानांना एकत्र आणून आधुनिक भारताचा पाया रचला.
याच महान कार्याची आणि देशाच्या एकता व अखंडतेची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय एकता दिवस आपल्याला हेच शिकवतो की, जेव्हा प्रत्येक नागरिकाचे मन एकत्र होते, तेव्हाच राष्ट्र मजबूत बनते. या खास प्रसंगी, सरदार पटेलांचे प्रेरणादायक विचार आणि संदेश आपल्या मित्रपरिवाराला पाठवून त्यांच्या योगदानाचे स्मरण करा.

राष्ट्रीय एकता दिवस का साजरा केला जातो?
राष्ट्रीय एकता दिवस दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, अखंडता आणि बंधुत्वाची भावना मजबूत करणे हा आहे. स्वातंत्र्यानंतर ५६५ हून अधिक संस्थानांचे एकत्रीकरण करून पटेलांनी आधुनिक भारताचा पाया रचला, म्हणून त्यांना भारताचे लोहपुरुष म्हटले जाते.
सरदार पटेल जयंती, प्रेरणादायक संदेश (Wishes in Marathi)
- भारताच्या एकता आणि अखंडतेचे प्रतीक असलेल्या लोहपुरुषाला नमन.
- या एकता दिनानिमित्त आपण सर्वजण मिळून देशाला मजबूत करण्याचा संकल्प करूया.
- सरदार पटेलांसारखे कणखर राहा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- एकताच भारताची खरी शक्ती आहे - जय हिंद!
- या एकता दिनी प्रत्येक भारतीयाने अभिमानाने सांगावे - आम्ही एक आहोत.
- लोहपुरुषाला कोटी-कोटी नमन, ज्यांच्या विचारांनी भारताला जोडले.
राष्ट्रीय एकता दिवस प्रेरणादायक कोट्स (Quotes in Marathi):
- "एकतेतच शक्ती आहे, विभाजनामध्ये विनाश." - सरदार पटेल
- "आपल्यासाठी राष्ट्र सर्वात प्रथम आहे." - पटेल
- "जर एकता नसेल, तर स्वातंत्र्याला कोणताही अर्थ राहणार नाही."
- "देशाची सेवा करणे हाच खरा धर्म आहे."
- "भारताचा आत्मा त्याच्या विविधतेतील एकतेमध्ये आहे."
सरदार पटेल जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश
- "एकता नसलेले मनुष्यबळ हे सामर्थ्य नाही." - सरदार पटेल यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन देशाच्या एकात्मतेचा संकल्प करूया. राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- भारताच्या एकता आणि अखंडतेचे प्रतीक, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन.
- "कठीण प्रसंगी जो एकजुट राहतो, तोच खरा भारतीय." सरदार साहेबांचे हे विचार नेहमी प्रेरणा देत राहतील.
- सरदार पटेल यांनी देशाला एका सूत्रात बांधले. त्यांच्या दृढ संकल्पाला आणि महान कार्याला सलाम. जय हिंद!
- लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी त्यांच्या आदर्श आणि मूल्यांचे अनुसरण करण्याचा संकल्प करूया.
- "एक भारत, श्रेष्ठ भारत" हे स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोहपुरुषाच्या जयंतीवर कोटी-कोटी नमन.
- या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त, जाती-भेदभाव विसरून आपण सर्वजण एकत्र येऊया आणि देशाला मजबूत बनवूया.
- "आज हमें ऊंच-नीच, अमीर-गरीब, जाति-पंथ के भेदभावों को समाप्त कर देना चाहिए।" - सरदार पटेल. त्यांचे हे वचन नेहमी लक्षात ठेवूया.
- एकता हीच आपली खरी शक्ती आहे. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी भारताच्या या शक्तीला सलाम!
- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अदम्य साहस आणि दूरदृष्टीला प्रणाम. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रसेवेसाठी समर्पित होऊया. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त खूप शुभेच्छा!
- भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून एकच सूर ऐकू यावा, "आम्ही सर्व भारतीय आहोत" हेच सत्य राहो.
- एकतेची भिंत कधीही तुटू नये, भारत मातेची लेकरं सदा एका रूपात नांदावी.
- जय एकता, जय भारत, जय सरदार, तुमचे विचारच आहेत देशाचा आधार.












Click it and Unblock the Notifications