राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारीलाच का साजरा होतो?, महत्त्व काय, यंदाची थीम काय, वाचा सविस्तर
National Science Day 2025 : 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. हा दिवस भारतात विज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रातील योगदान करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा हा दिवस आहे. चला तर राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण सर्वात आधी विज्ञान दिन का साजरा केला जातो, त्यामागील मुख्य उद्देश काय, केव्हापासून हे सुरू झाले, याविषयी जाणून घेऊया. तसेच 2025 ची विज्ञान दिनाची नेमकी थीम काय आहे.
रामन इफेक्टचा शोध अन् नोबल पुरस्कार मिळाला
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व समजून घेण्याआधी सर्वात आधी आपण नेमकं काय घडलं. कोणाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो हे समजून घेणे गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी 'रामन प्रभाव' (Raman Effect) शोधला. हा शोध त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवून देणारा ठरला. या पुरस्कार प्राप्तीनंतर भारताचे विज्ञानाविषयातील नाव जगभरात पोहोचले.
'रामन प्रभाव' म्हणजे प्रकाशाच्या कणांचा पदार्थाच्या अणूंसोबत संवाद साधून प्रकाशाच्या लहरींच्या रंगांमध्ये होणारा बदल. या ऐतिहासिक शोधामुळे भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली, आणि भारतीय विज्ञानाला एक मान्यता प्राप्त झाली.

राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे महत्त्व काय?
राष्ट्रीय विज्ञान दिवस हा दिवस विज्ञानाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आहे. विज्ञानाने आपल्या दैनंदिन जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे आणि प्रत्येक क्षेत्रात नवीन संशोधनामुळे प्रगती होत आहे. विज्ञानाची गोडी लावून नवीन संशोधनाची निर्मिती करणे, नवीन संशोधन उदयास येणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
विज्ञान शिक्षणाचा प्रसार
२८ फेब्रुवारी हा दिवस शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रेरणा मिळते. विविध विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करणे. विज्ञानसंबंधी स्पर्धांचे आयोजन केले जाते. विज्ञानात रुची निर्माण व्हावी म्हणून अनेक उपक्रम राबविले जाताता.
सी. व्ही. रामन यांचा सन्मान
28 फेब्रुवारी हा विज्ञान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी सी. व्ही. रामन यांच्या शोधाचे महत्त्व आणि त्यांच्या योगदानाचे सन्मान केले जाते. त्यांच्या 'रामन प्रभाव'च्या शोधामुळे भारताला एक वैज्ञानिक शक्ती म्हणून ओळख मिळाली. त्याअनुषंगाने सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे शाळा, महाविद्यालायात पूजन होते. त्यांच्या शोधाचे स्मरण करून नवीन काही तरी निर्माण करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये निर्माण व्हावी, त्यासाठी विज्ञान दिवस साजरा केला जातो.
विज्ञानातील संशोधनाला चालना
राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध विज्ञान शाखांमध्ये नव्या संशोधनाला प्रोत्साहन देतो. यामुळे शास्त्रज्ञ आणि संशोधक नवीन शोध घेण्यासाठी प्रेरित होतात, आणि विज्ञान क्षेत्रात प्रगती घडवते. आता विज्ञान आणि रुढी परंपरा याला भेदून नवीन संशोधन कसे समाजासाठी उपयुक्त ठरू शकते, यावर भर दिला जातो.
या वर्षाची थीम काय आहे?
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दरवर्षी एका थीमवर काम केले जाते. 2025 साठी राष्ट्रीय विज्ञान दिवसाची थीम आहे, "विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेषामध्ये जागतिक नेतृत्वासाठी भारतीय तरुणांना सशक्त करणे". या थीमवर वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर या थीम आधारित संशोधन करणे. तसेच नवतरुणांना अधिक संधी देणे हा त्यामागील उद्देश आहे.












Click it and Unblock the Notifications