Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

2024 मध्ये या व्हिडिओंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ,तोडले अनेक रेकॉर्ड,घ्या जाणून

Year Ender 2024: 2024 हे वर्ष संपायला आता फक्त एक महिना बाकी आहे. मात्र या चालू वर्षात असे अनेक व्हायरल झाले आहेत. जे 2024 मध्ये सर्वाधिक पाहिले गेले आहेत. जगभरातील सोशल मीडियावर या व्हिडीओंनी यूजरचे लक्ष वेधून घेतले आहे. तर या लेखात आम्ही तुम्हाला या वर्षातील काही सर्वाधिक व्हायरल झालेल्या व्हिडिओंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी इंटरनेट विश्वात चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

या यादीत पहिले नाव 'बेबी शार्क डान्स' व्हिडिओचे आहे. हा व्हिडिओ सर्वाधिक लाइक केलेला व्हिडिओ बनला आहे. हा व्हिडीओ भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दक्षिण कोरियन कंपनी पिंकफॉन्ग द्वारे निर्मित त्याच्या आकर्षक ट्यून आणि सोप्या गीतांमुळे ते लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला आहे.

Year Ender 2024

रिपोर्ट्सनुसार 'बेबी शार्क डान्स' व्हिडिओ यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंमध्ये टॉपवर आहे. त्याच वेळी यानंतर 2024 मध्ये इंस्टाग्राम स्टोरीज आणि रील्सवर खूप धमाल करणाऱ्या 'बंदेया गाण्याचा' क्रमांक लागतो. याशिवाय बॉलीवूड आणि अल्बम गाण्यांनीही यंदा सोशल मीडियावर चांगलचं वर्चस्व गाजवलं आहे.

'अहा टोमॅटो बडे मजेदार' आणि 'Bado Badi' सारख्या ट्रॅकने अनेकांची मने जिंकली आहेत, तर ॲनिमलच्या "जमाल कुडू" वरील अनेक चाहत्यांनी बनवलेले रील्सही व्हायरल झाली आहेत. या व्हिडिओंवर रील्स बनवून लोकांना खूप लाइक्स मिळाले आहेत. एवढेच नाही तर राजकुमार रावच्या 'स्त्री 2' चित्रपटातील 'आज की रात' आणि 'तू आयी नहीं' ही गाणीही यावर्षी ट्रेंडमध्ये आली आहेत.

ही गाणी प्रेक्षकांनी खूप शेअर केली आहेत आणि पसंत केली आहेत, ज्यामुळे 2024 च्या लोकप्रिय गाण्यांच्या यादीत त्यांचे स्थान निश्चित झालं आहे. याशिवाय एका डिजिटल क्रिएटरने इंस्टाग्रामवर एका अनोख्या थाळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. पोस्ट त्याच्या अनोख्या नावामुळे व्हायरल झाली, ज्याने यूजरला आकर्षित केलं आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे क्रिएटरने 'थाली' हे नाव जोडलं आहे, ज्यामुळे ते सगळ्यात वेगळेपण दिसत होते. त्यामुळे यूजरचे लक्ष वेधले गेले. इतकेच नाही तर अतिशय क्रिएटिव्ह पद्धतीने त्याने 'नाम थाली आयडियाज' या पोस्टला कॅप्शनही दिले, ज्यामुळे यूजर्समध्ये उत्सुकता निर्माण झाली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+