Phule Jayanti : विद्येविना मती गेली...!, महात्मा फुले जयंतीनिमित्त मित्रपरिवारांना पाठवा खास संदेश
Mahatma Jyotiba Phule Jayanti 2025 wishesh in Marathi : महात्मा ज्योतिबा फुले यांची 11 एप्रिल 2025 रोजी 197 वी जयंती साजरी केली जात आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त् त्यांना विनम्र अभिवादन...!
महात्मा फुले यांचा जन्म कुठे व त्यांचे कार्य काय?
महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे झाला आणि या वर्षी त्यांची 197 वी जयंती आहे. ते एक समाजसुधारक, विचारवंत आणि लेखक होते ज्यांनी आपले जीवन शोषितांच्या शिक्षणासाठी आणि उत्थानासाठी तसेच अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी समर्पित केले.

1848 मध्ये ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी एक शाळा उघडली, जी भारतातील महिला शिक्षणाच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल होते. त्यावेळी पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी एक महत्त्वपूर्ण मोहीम देखील सुरू केली होती. यासह त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले. त्यांचे जीवन हे आदर्शवत जीवन होते. त्यांना जयंतीनिमित्त शत शत नमन..!
महात्मा फुले जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला खास संदेश पाठवून महात्मा फुले यांना अभिवादन करू शकता. तसेच त्यांचे विचार लोकांपर्यंत पाठवू शकता.
महात्मा ज्योतिबा फुले नेहमी म्हणायचे...!
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।
स्त्री शिक्षणाचे प्रणेते, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात,
काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
----------
स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो,
कधी जातीचा तर कधी धर्माचा,
धर्म महत्त्वाचा नाही, माणुसकी असली पाहिजे..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
-------
शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या
महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे
पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
------
विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या
सर्व कष्टांचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
------
स्व:ताच्या हितासाठी काही लोकांनी
काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
-----
नवीन विचार तर दररोज येत असतात
पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
-----
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा
एक महान क्रांतिसूर्य..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
------
जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील
तर त्यांची जात विचारू नका..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
------
आर्थिक विषमता ही शेतकऱ्यांची दैन्यास कारणीभूत आहे..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
-----
स्वार्थाला वेगवेगळी रूपं मिळतात.
हे कधी जातीचे तर कधी धर्माचे रूप धारण करते..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
-----
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे,
समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे,
बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर विचारवंत..
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Click it and Unblock the Notifications