महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीदिनी 'हे' शुभेच्छा संदेश शेअर करा, जीवन बदलून टाकणारी त्यांची 'ही' वचनं
Mahatma basweshwar jayanti 2025 wishes : ज्या काळात गुलामगिरी आणि सत्तासंघर्षांनी जग ग्रासले होते, जनतेच्या मताला काहीही किंमत नव्हती, गुलामगिरी आणि पिचलेल्या अवस्थेत समाजाला राहावे लागत होते अशा काळात लोकशाही कशी असणार..? लोकशाहीचा यत्किंचितही कुणी तेव्हा विचार केला नसेल..तेव्हा सर्वप्रथम जगात लोकशाहीचे प्रणेते जन्माला आले ते म्हणजे महात्मा बसवेश्वर...

महात्मा बसवेश्वर यांनी समता, न्याय, स्त्रीपुरुष समानता आदी तत्वाचा अवलंब केला; प्रत्यक्ष ती तत्व अंगिकारत त्यांनी सर्वधर्मसमभावाला प्रोत्साहन दिले, जातीअंताचा लढा त्यांनी लढला. लोकशाहीचे उद्गगाते म्हणून त्यांना संबोधले जाते. अशा या जगद्ज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांची 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच आज अक्षय तृतीयेला जयंती आहे. यानिमित्त खास शुभेच्छा संदेश आणि त्यांची काही वचन देत आहोत. त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्या मित्र, प्रियजनांना पाठवून महात्मा बसवेश्वरांचे विचार पोहचवू शकता.
महात्मा बसवेश्वर जयंतीसाठी शुभेच्छा संदेश (mahatma basweshwar jayanti 2025 wishes in Marathi)
1. अनुभव मंटपाच्या माध्यमातून जगातील सर्वात पहिले लोकशाहीचे प्रणेते महात्मा बसवेश्वर... क्रांतीसूर्याला जगद्ज्योती बसवण्णाच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...!
2. भारतालाच नव्हे जगाला समतेची शिकवण देणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
3. समतेची शिकवण देत समाजात क्रांती घडवणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा...!
4. महान जगतज्योती बसवण्णांनी समतेच्या विचारांचा प्रसार करून क्रांती घडवली.
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...
5. जातीच्या भिंती तोडून जगात सर्वधर्म समभावाची शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली. अशा या महान थोर जगद्ज्योतीच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
6. महात्मा बसवेश्वरांनी समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह याची जगाला शिकवण दिली. स्त्री-पुरुष समानतेची बीजं रोवली.
महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

महात्मा बसवेश्वरांची वचनं ( mahatma basweshwar jayanti 2025 vachan in marathi)
1. माझ्यापेक्षा लहान कोणी नाही,
शिवभक्तापेक्षा महान कोणी नाही,
याला माझे मन साक्षी, तुमचे चरण साक्षी
कूडलसंगमदेवा.
2. तेच सदाशिवलिंग, असा विश्वास ठेवावा,
विश्वास ठेवताच तू विजयी पहा.
अधरास कडू, उदरास गोड,
कुडलसंगाच्या शरणांचे वचन
कडूलिंब चाखल्यागत.
3. आद्यांचे वचन परीस माने मी,
परि ते परीस कैसे गवसे मज ?
तन-मन-धन वर्जून सांगे मी,
परि त्याचा स्पर्श सहन न होई मज
अंत्यजाच्या ढोलकीसम बोलणारा दांभिक मी,
कुडलसंगमदेवा.
4. वेदावर खडग प्रहार करेन
शास्त्राला बेड्या लावीन
तर्कशास्त्राच्या पाठीवर आसूड ओढेन
आगमशास्त्राचे नाक कापेन
मातंग चेन्नयाचा प्रिय आहे मी,
कुडलसंगमदेवा.
5. दगडाचा देव देव नव्हे। मातीचा देव देव नव्हे।।
वृक्षदेव देव नव्हे। सेतु बंध रामेश्वर।।
अन् इतर क्षेत्राचा। देव देव नव्हे।।
देव तुमच्या अंतर्यामी। हे कुडलसंगमदेवा।।
6. आद्यांचे वचन परीस माने मी,
परि ते परीस कैसे गवसे मज ?
तन-मन-धन वर्जून सांगे मी,
परि त्याचा स्पर्श सहन न होई मज
अंत्यजाच्या ढोलकीसम बोलणारा दांभिक मी,
कुडलसंगमदेवा.












Click it and Unblock the Notifications