Maha Kumbh 2024: ही 'सुंदर साध्वी' कोण आहे? इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स, जुने व्हिडिओ, फोटो व्हायरल
Maha Kumbh 2024 Beautiful Sadhvi Harsha Richaria : प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. या महा कुंभमेळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. विविध आखाड्यांमधील संत संगमच्या काठावर पोहोचले आहेत आणि महाकुंभाच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
ही 'सुंदर साध्वी' कोण आहे?
यादरम्यान निरंजनी आखाड्याच्या मिरवणुकीतील एका साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या साध्वीचे वर्णन महाकुंभातील सर्वात सुंदर साध्वी म्हणून केलं जात आहे. साध्वीचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ही साध्वी दुसरी तिसरी कोणी नसून हर्षा रिचारिया आहे. तिचे इंस्टाग्रामवर साडेसात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हर्षाने व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला सांगितले की, ती निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी जी यांची शिष्या आहे. हर्षा यांचं अकाउंट पाहिलं तर हे स्पष्ट होते की, ती तिच्या इंस्टाग्रामवर बहुतेकदा धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवर कंटेंट शेअर करते. तिचं सोशल मीडिया प्रोफाइल देखील वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओंनी भरलेलं आहे.
व्हिडिओ आणि फोटो का व्हायरल होत आहेत?
हर्षा रिचारियाचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विशेषतः तिचा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये ती रथावर स्वार होऊन महाकुंभात प्रवेश करत दिसत आहे. तो व्हिडीओ सोशल मीडिया आणि युट्यूबर्सचे लक्ष वेधून घेत आहे. यादरम्यान एका युट्यूबरने तिला विचारले की, इतकी सुंदर असूनही, तिने साध्वी होण्याचा निर्णय का घेतला? यानंतर हर्षा रिचारिया 'सर्वात सुंदर साध्वी' म्हणून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
हर्षाने काय उत्तर दिले?
हर्षा रिचारियाने सांगितले की, ती उत्तराखंडची आहे आणि साध्वी होण्यापूर्वी ती सामान्य जीवन जगत होती. दोन वर्षांपूर्वी ती सांत्वनाच्या शोधात साध्वी बनली. आणि तिथून पुढे तिचा धार्मिक प्रवास सुरू झाला आहे. हर्षाने म्हटलं आहे की, महाकुंभ हा एक ऐतिहासिक आणि भव्य कार्यक्रम आहे. प्रत्येक हिंदू आणि सनातनीने त्यात सहभागी झाले पाहिजे. 144 वर्षांनंतर महाकुंभाचे आयोजन होत असल्याने त्यांच्यासाठी हा कार्यक्रम खूप महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
हर्षा साध्वीवरुन सोशल मीडियावर वाद
हर्षा साध्वी झाल्यानंतर तिचे जुने व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर येऊ लागले. अनेक यूजरनी असा दावा केला की, हर्षाचे साध्वी होण्याचे विधान खोटे आहे. तर काहींनी असा आरोपही केला की ती एक कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर आहे, जी फक्त प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी साध्वी असल्याचे भासवते.
एका युजरने तर असंही म्हटलं की, हर्षा दोन महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमाचे आयोजन करत होती आणि ती अचानक साध्वी कशी बनली? हर्षाच्या इंस्टाग्रामवर तिची जीवनशैली, तिचा धार्मिक प्रवास आणि तिचे मेकअप व्हिडिओ पोस्ट केले जातात. तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरील कंटेंट धार्मिक असतो, परंतु त्यात मेकअप आणि शो होस्टिंग सारख्या विषयांचाही समावेश असतो. काही वापरकर्त्यांनी याला सनातन धर्माचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications