महाराष्ट्र दिनी खूशखबर! LPG गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात किती रुपयांना मिळणार सिलिंडर वाचा
LPG Price Today : महाराष्ट्र दिनी आज एक मोठे गिफ्ट राज्यातील जनतेला मिळाले आहे. गॅस सिलिंडर स्वस्त झाले आहेत. हा मोठा दिलासा राज्यातील मध्यमवर्ग आणि गरीब जनतेला मिळाला आहे.
आज मे महिन्याच्या पहिल्या दिवशी मिळाली आनंदाची बातमी इंडियन ऑइलने दिली आहे. आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 17 रुपयांची कपात झाली आहे, ज्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या कपातीनंतर, दिल्लीत आतापर्यंत 1762 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 1742 रुपयांना उपलब्ध होईल. तर मुंबईत हेच सिलिंडर 1696 रुपयांना मिळणार आहे. नवीन किमती देखील आजपासून लागू झाल्या आहेत.

आजपासून गॅस सिलिंडरच्या किती झाले दर?
नवीन बदलानंतर, देशातील चार महानगरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलल्या आहेत. त्या किती आहेत हे जाणून घेऊया.
- दिल्ली 1742 रुपये
- मुंबई - 1696 रुपये
- कोलकाता - 1851 रुपये
- चेन्नई - 1904 रुपये
घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही
तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात जरी केली असली तरीही घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. उलट 8 एप्रिल रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली. आता 14 किलो गॅस सिलेंडरची किंमत 853 रुपये इतकी झाली आहे.
- दिल्ली - 853 रुपये
- कोलकाता - 879 रुपये
- मुंबई - 852 रुपये
- चेन्नई - 870.50 रुपये
व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरमध्ये फरक काय?
- घरगुती एलपीजी सिलेंडर आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरमध्ये मोठा फरक आहे.
- व्यावसायिक एलपीजी सिलेंडर (एलपीजी किंमत) व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा वापर हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट्स, केटरिंग, उद्योग इत्यादी व्यावसायिक आस्थापनांमध्ये केला जातो.
- व्यावसायिक गॅस सिलिंडर हा व्यावसायिक कामासाठी वापरला जातो, जो 19 किलोचा असतो. 35 किलो किंवा 47.5 किलोमध्ये येतात.
- व्यावसायिक सिलिंडरमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. हे सिलिंडर निळ्या रंगाचे असते.
- घरगुती सिलेंडर फक्त घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जातो. या सिलिंडरचे वजन 14.2 किलो असते.
- काही भागात 5 किलोचे छोटे सिलिंडर देखील उपलब्ध आहेत. यावर सरकारकडून अनुदान दिले जाते. हे साधारणपणे लाल रंगाचे असतात.
हेही वाचा : गॅस सिलिंडर वापरताना दुर्घटना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? तज्ज्ञांकडून समजून घ्या
हेही वाचा : उज्ज्वला योजनेतून आता एकाच कुटुंबातील 2 महिलांना मिळणार मोफत सिलिंडर!, कसे ते घ्या जाणून
हेही वाचा : वेटींग रेल्वे तिकीटातून रिझर्व्हेशन सेवा मिळणार नाही! LPG गॅस ते ATM आजपासून नियम बदलले, खिशाला फटका












Click it and Unblock the Notifications