LPG Gas Price Hike: मार्चच्या पहिल्याच दिवशी सिलिंडरच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
LPG Gas Price Hike: मार्चच्या पहिल्या दिवशी लोकांना मोठा धक्का बसला आहे, खरं तर, सरकारी तेल बाजार कंपन्यांनी आज सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 6 रुपयांची वाढ केली आहे, त्यानंतर दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता 1803 रुपये झाली आहे जी आतापर्यंत 1797 रुपयांना मिळत होती.
दरम्यान कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. त्याचे दर स्थिर आहेत ही दिलासादायक बाब आहे. 1 फेब्रुवारी रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 7 रुपयांनी कमी करण्यात आली होती पण आज ती 6 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत.

देशातील प्रमुख शहारात 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत खालीलप्रमाणे
दिल्ली - 1803 रुपये
मुंबई - 1913 रुपये
कोलकाता - 1913 रुपये
चेन्नई - 1965.50 रुपये
देशातील प्रमुख शहारातील घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत खालीलप्रमाणे
दिल्लीत- 803 रुपये
कोलकाता- 829 रुपये
मुंबईत - 802.50 रुपये
चेन्नईमध्ये - 818.50 रुपये
दरम्यान गेल्या तीन-चार महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. परंतु ऑगस्ट 2024 पासून घरगुती सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत.
घरगुती सिलेंडर
- घरगुती एलपीजी सिलिंडर प्रामुख्याने घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी वापरले जातात. त्याचे वजन साधारणपणे 14.2 किलो असते.
-घरगुती एलपीजी सिलिंडरवर सरकारकडून अनुदान दिले जाते, ज्यामुळे त्याची किंमत कमी होते.
-घरगुती सिलिंडरसाठी सुरक्षा मानके वेगळी आहेत आणि ती घरगुती उपकरणांसह सुरक्षितपणे वापरली जातात.
-घरगुती एलपीजी सिलिंडर गॅस एजन्सी आणि डीलर्सकडून सहज उपलब्ध आहे आणि ग्राहक घरी बसून ते ऑर्डर करू शकतो.
- घरगुती सिलिंडर बुकिंग ऑनलाइन, गॅस एजन्सींद्वारे किंवा मोबाईल अॅपद्वारे करता येते.












Click it and Unblock the Notifications