मुर्शिदाबाद जळतंय अन् खा. युसुफ पठाणची मौज-मजा, BJPचा हल्ला; जाणून घ्या - मुर्शिदाबादमध्ये काय झालंय
BJP Attack On TMC MP and Ex Cricketer Yusuf Pathan : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्हा सध्या वक्फ कायद्याच्या विरोधात झालेल्या निषेधादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या आगीत जळत आहे.
दुसरीकडे क्रिकेट विश्वातून राजकारणात प्रवेश केलेल्या युसूफ पठाण यांचे नावही या हिंसाचारात ओढले जात आहे. पश्चिम बंगालमधील बहरामपूर येथील तृणमूल काँग्रेसचे खासदार पठाण यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची घटना घडलेली असताना दुसरीकडे ते मौजमजा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे.
शनिवारी दोघांना मारहाण, त्यात मृत्यू
मुर्शिदाबाद हिंसाचारात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे शनिवारी एका हिंसक जमावाने एका माणसाला आणि त्याच्या मुलाला मारहाण करून ठार मारले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती बनवायचे. 11 एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या तरुणाचाही रुग्णालयात मृत्यू झाला.
भाजप-टीएमसीमध्ये आरोप-प्रत्यारोप
मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारावरून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि राज्यातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे ममता बॅनर्जी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. त्याच वेळी, तृणमूल काँग्रेस भगव्या पक्षावर लोकांना भडकावण्याचा आरोप करत आहे.

तृणमुल खासदार युसूफ पठाणवर हल्लाबोल
दरम्यान, बहरामपूर येथील तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांच्या एका इंस्टा पोस्टमुळे गोंधळ उडाला. पठाण यांनी चहा पितानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. लिहिले- 'शुभ दुपार, चांगली चहा आणि शांत वातावरण... चांगले क्षण अनुभवत आहे.'
युसूफ पठाणचा हा फोटो पाहून भाजप नेत्यांसह अनेकांना राग आला. त्यांनी टीएमसी खासदाराची तुलना प्राचीन रोमचा राजा नीरोशी केली, ज्याच्याबद्दल एक प्रसिद्ध म्हण आहे की जेव्हा रोम जळत होता तेव्हा नीरो बासरी वाजवत होता.
हे ही वाचा : वक्फ कायद्याच्या निषेधार्थ मुर्शिदाबादेत काढलेल्या मोर्चात हिंसाचार; पोलिसांवर दगडफेक-वाहने जाळली
युझर्स म्हणाले- हा तर बॅनर्जी यांचा भाड्याने घेतलेला खासदार
शेखर भट्टाचार्य नावाच्या एका वापरकर्त्याने फेसबुकवर युसूफ पठाणचा हा फोटो पोस्ट केला आणि म्हटले की, 'हा ममतांचा भाड्याने घेतलेला खासदार आहे.' रोम जळत असताना नीरोने व्हायोलिन वाजवण्यापेक्षा हे भयानक आहे.
On one hand There is Targeted violence against Hindus in Bengal, on other hand TMC MP is enjoying and posting pictures on Social Media and teasing the Hindu victims.
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) April 13, 2025
Mamta Banerjee is running an Anti Hindu Administration in Bengal.#MurshidabadViolence pic.twitter.com/G5icqb5O4a
प्रदीप भंडारी यांनी देखील केला पठाणवर हल्लाबोल
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही हा फोटो रिट्विट केला आणि लिहिले की, 'तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचा हा फोटो स्पष्ट करतो की एकीकडे ममता बॅनर्जी बंगालमध्ये हिंदूंविरुद्ध लक्ष्यित हिंसाचार भडकावत आहेत आणि दुसरीकडे खासदार मजा करत आहेत.' यावरून हे स्पष्ट होते की तृणमूल काँग्रेस हिंदूंचा द्वेष करते आणि ही संपूर्ण हिंसाचार पूर्वनियोजित आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी : वक्फ सुधारणा कायदा आजपासून अधिकृतपणे लागू, केंद्राने जारी केले राजपत्र
वक्फ कायद्याच्या विरोधात मुर्शिदाबादमध्ये हिंसा, टाईमलाईन
- वक्फ अधिनियमच्या विरोधात गेल्या काही दिवस मुर्शिदाबाद पेटलेले आहे. राज्याच्या विविध भागात हिंसाचार सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. सुती आणि शमसेरगंज परिसरातील हजारो लोकांच्या मोर्चा काढण्यात आला आहे.
- त्यांनी साजुर चौकाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12 बंद पाडण्यासाठी हिंसाचार केला, परंतू पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले आहे. या वेळी काही निदर्शकांनी बॉम्ब फेकल्याचे कथितरित्या म्हटले जात आहे.
- तसेच निदर्शकांनी पोलिसांवर देखील दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांवर विटा आणि दगड फेकल्याने अनेक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत.
- भाजपाचे आमदार गौरीशंकर घोष यांनी या आधीच भविष्यवाणी केली होती की वक्फ विधेयक पारित झाल्यानतर येथे स्थिती चिंताजनक होऊ शकते. ते म्हणाले की लोक घाबरलेले आहेत.
- सोशल मीडियावरील विभिन्न पोस्ट पाहून आम्ही घाबरलो आहोत. वक्फ विधेयकाविरुद्ध मुर्शिदाबाद येथे पुन्हा अशांततेचे वातावरण पसरु शकते असेही त्यांनी म्हटले आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
Kuldeep yadav wedding date : कुलदीप यादव बोहल्यावर चढणार! कोण आहे होणारी पत्नी वंशिका? जाणून घ्या -
पुरुषांनो, 'या' 5 सामान्य लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; असू शकतो वाढलेल्या प्रोस्टेटचा धोका! -
वयाच्या 30व्या वर्षीच विसरभोळेपणा वाढलाय? सावधान 'ब्रेन' हा आजार असू शकते, जाणून घ्या लक्षणे







Click it and Unblock the Notifications