मोठी बातमी : वक्फ सुधारणा कायदा आजपासून अधिकृतपणे लागू, केंद्राने जारी केले राजपत्र
Waqf Act 2025 officially implemented : केंद्र सरकारने वक्फ सुधारणा कायदा 2025 अधिकृतपणे लागू केला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर आणि राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर काही दिवसांतच हा कायदा लागू झाला. त्याचबरोबर, देशातील वक्फशी संबंधित कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल औपचारिकपणे लागू झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्राने वक्फ (सुधारणा) कायदा 2025 हा 8 एप्रिल 2025 पासून लागू करणारी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना द गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाली आहे.

8 एप्रिल 2025 पासून वक्फ सुधारणा कायदा लागू
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या वतीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने कायद्याच्या कलम 1 च्या उपकलम (2) अंतर्गत संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, 8 एप्रिल 2025 ही तारीख वक्फ (सुधारणा) कायदा 2025 च्या सर्व तरतुदी लागू होण्याची तारीख म्हणून घोषित केली आहे.
#BREAKING Waqf Amendment Act 2025 to come into effect from today. Centre issues notification. pic.twitter.com/YdVg24mINj
— Live Law (@LiveLawIndia) April 8, 2025
या कायद्यानंतर वक्फ बोर्डसंदर्भात काय होणार?
या दुरुस्तीअंतर्गत, वक्फ बोर्डाच्या कामकाजात सुधारणा, मालमत्तेच्या नोंदींचे डिजिटायझेशन आणि अनधिकृत कब्ज्यांविरुद्ध कठोर कारवाई अशा अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय, सामान्य जनतेला वक्फ मालमत्तेची माहिती मिळविण्याचे अधिक अधिकार देण्यात आले आहेत. सरकारचे म्हणणे आहे की हे पाऊल सुधारणा, पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा प्रयत्न असणार आहे.
अनेक राज्यांमध्ये कायद्याविरोधात निदर्शने
देशातील अनेक राज्यांमध्ये नवीन वक्फ कायद्याविरोधात निदर्शने सुरू असताना, काँग्रेस, एआयएमआयएम आणि आम आदमी पक्षाने (आप) स्वतंत्र याचिकांसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
केंद्र सरकारच्या मते, हा कायदा मुस्लिमविरोधी नाही आणि त्याचा उद्देश वक्फ मालमत्तेचा भेदभाव आणि गैरवापर रोखणे आहे. लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने 288 तर विरोधात 232 मते पडली. तर राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते पडली आहेत.












Click it and Unblock the Notifications