Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! मंगळुरूत माॅब लिंचिंग; 'पाकिस्तानचा नारा देणाऱ्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू, 10 जणांना अटक

Karnataka mob lynching in Mangaluru : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीनच ताणले आहेत, अशातच पाकिस्तानसंदर्भात कोणतीही नरमाईची भूमिका अथवा सकारात्मक बाब जर कुणी उच्चारली तर त्याला ट्रोल केले जात आहे. त्याचे कारण म्हणजे पाकिस्तानच्या कुरापती आणि दहशतवाद्यांना देत असलेले प्रोत्साहन..

या गोष्टींना चालना देत असल्याने पाकिस्तानबद्दल भारतीय नागरिकांच्या संतप्त भावना अनेकदा व्यक्त झाल्या आहेत. लोक रस्त्यावर आणि सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

Karnataka mob lynching in Mangaluru

अशातच बुरखाधारी महिला रस्त्यावर चिटकवलेले पाकिस्तानचे झेंडे उचलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, यावरुन त्या महिला ट्रोल झाल्या, त्यानंतर आता क्रिकेट सामन्यादरम्यान धक्कादायक घटना कर्नाटकमध्ये घडली आहे.

पाकिस्तानचे नारे देणाऱ्या युवकाची हत्या

पंजाब केसरीने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकातील मंगळुरू येथे एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान एका व्यक्तीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने जमाव भडकला व या जमावाने व्यक्तीला मारहाण केली या मारहणाती तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

माॅब लिंचिंगचा प्रकार, कुडूप भागातील घटना

क्रिकेट सामन्यावेळी घडलल्या या घटनेला आता 'मॉब लिंचिंग' म्हटले जात आहे. कारण जमावाने मारहाण केली आणि यात तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरु आहे.
रिपोर्टनुसार, आतापर्यंत सुमारे पंधरा लोकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जात आहे.

कसा घडला प्रकार?

सामना सुरू असताना एक अज्ञात व्यक्ती मैदानात घुसला आणि तो 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देऊ लागला. यामुळे तेथे लोक संतप्त झाले आणि त्यांनी या तरुणाला घेरले त्यानंतर मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.

काय म्हणाले कर्नाटकचे गृहमंत्री?

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी मंगळवारी या घटनेबद्दल स्पष्ट सांगितले की, क्रिकेट सामन्यादरम्यान "पाकिस्तान झिंदाबाद" अशी घोषणा दिल्यामुळे मंगळुरूमधील कुडूपूजवळ एका व्यक्तीला जमावाने मारहाण केली. या घटनेशी संबंधित सुमारे 10 लोकांना अटक करण्यात आली असे एनआयच्या वृत्तात म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना परमेश्वरा म्हणाले, स्थानिक क्रिकेट सामना सुरू असताना 'पाकिस्तान झिंदाबाद' असा नारा तरुणाने दिला त्यावेळी काही लोक गोळा झाले आणि त्याला मारहाण केली. यानंतर त्या तरुणाचा मृत्यू झाला. 10 ते 12 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे..."

शांतता राखा -जनतेला सरकारचे आवाहन

झालेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी जनतेला शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू राव यांनी या घटनेला "क्रूर घटना" असे संबोधले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+